Saturday, September 26, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांचा धडाका; ‘दुर्गा’ मालिकेचा प्रोमो आऊट!

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने ‘कलर्स मराठी’च्या नव्या लूकचं अनावरण केलं आहे. या फ्रेश लूकप्रमाणे काही नवे कार्यक्रम आणि मालिकादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अंगावर शहारे आणणारा महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा टीझर आऊट झाला. अशातच आता ‘कलर्स मराठी’च्या नव्या प्रवासाचा ‘दुर्गा’ ही नवी मालिकादेखील भाग असणार आहे. या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेणार हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे. दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

‘दुर्गा’ हे पात्र साकारणारी रूमानी खरे म्हणाली ,”मालिकेचं कथानक ऐकल्या क्षणी आवडलं.’दुर्गा’ हे पात्र वेगळं आहे. स्वत:ची मतं ठामपणे मांडू शकणारी, स्वत:साठी उभी राहणारी अशी ‘दुर्गा’ आहे. ‘दुर्गा’च्या माध्यमातून चांगल्या माणसांसोबत छान काम करता येत आहे. मुळात कोणतीही गोष्ट उभी राहताना पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत खूप महत्त्वाची असते. सेटवर असणारी सकारात्मकता उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. ‘दुर्गा’ हे पात्र साकारताना मला मजा येतेय. प्रेक्षकांनादेखील हे पात्र नक्कीच आवडेल”.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading