Sunday, June 7, 2026
Latest NewsSports

Hockey India : महाराष्ट्र सब-ज्युनियर मुले संघाला उपविजेतेपद

– मुलींच्या संघाला तिसरा क्रमांक; ३ गोल करणारी अन्वी चमकली
पुणे : सूरत (गुजरात) येथे झालेल्या दुसऱ्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या संघाला तिसरे स्थान मिळाले.
मुलांच्या एकतर्फी अंतिम फेरीत हॉकी महाराष्ट्राला मध्य प्रदेशकडून 1-7 असा पराभव पाहावा लागला. आशीर आदिल खान (11वे – पीसी, 28वे, लव (17वे – पीसी), मोरया ऋषी (18वे) आणि अश्वनी पटेल  (23वे)  यांच्या सुरेख गोलांमुळे प्रतिस्पर्धी संघ वरचढ ठरला.  हाफटाइमला 0-5 अशा पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने रेहान खानच्या (३७व्या) पेनल्टी कॉर्नरवर गोलखाते उघडले. मात्र, लव (५०वे) आणि करण गौतम (५३वे) यांनी मध्य प्रदेशची आघाडी आणखी वाढवली.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी राहिल्यानंतर महाराष्ट्राने शूटआऊटमध्ये छत्तीसगड हॉकीचा 3-2 असा पराभव केला.
याआधी मुली गटातील तिसऱ्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफमध्ये महाराष्ट्राने हॉकी राजस्थानला 5-0 असे पराभूत केले. अन्वी रेवतचे (4′, 17व्या, 55व्या) तीन गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. निखिता वेताळ (2रे) आणि यशस्वी कुबडेने (54वे) प्रत्येकी एक गोल करताना विजयात मोलाचे योगदान दिले.
निकाल:
 
मुले
(अंतिम फेर): हॉकी महाराष्ट्र: 1 (रेहान खान 37′ – पीसी) पराभूत वि. हॉकी मध्य प्रदेश: 7 (आशीर आदिल खान 11′ – पीसी, 28′; लव 17′ – पीसी, 50′; मोरया ऋषी 18′; अश्वनी पटेल 23′ ‘; करण गौतम 53’). हाफटाईम: 5-0
उपांत्य फेरी (सोमवारी खेळला): हॉकी महाराष्ट्र: 2 (3) (रेहान शफी खान 34′ – पीसी, 58′ – पीसी; परेश राणे, रेहान शाली खान, सूरज शुक्ला) विजयी वि. छत्तीसगड हॉकी: 2 (2) (सिंग आदर्श राज 6′, ओम यादव 58′; लवी माणिकपुरी, राज आदर्श सिंह.)
मुली
तिसरे स्थान: हॉकी महाराष्ट्र: 5 (निखिता वेताळ 2′; अन्वी रेवत 4′, 17वे, 55वे; यशस्वी कुबडे 54वे’) विजयी वि. हॉकी राजस्थान: 0. हाफटाईम: 3-0
….

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading