Thursday, September 24, 2026
Latest NewsSports

राज्यस्तरीय ज्युनियर संघात पुण्याचे चार फुटबॉलपटू

– योगेश पिल्ले यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
पुणे : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) आगामी ज्युनियर बॉईज राष्ट्रीय फुटबॉल ( पहिला स्तर)  स्पर्धेसाठी निवडलेल्या राज्यस्तरीय संघात पुण्याच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. ही स्पर्धा नारायणपूर (छत्तीसगड) येथे २७ जुलै ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आरकेएम आश्रमा मैदानावर खेळली जाणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा ब गटात समावेश असून त्यात गोवा, दिल्ली आणि झारखंड संघ आहेत. महाराष्ट्राची सलामीची लढत ३ ऑगस्टला गोवाविरुद्ध आहे
राज्याच्या २२ सदस्यीय संघात शौनक समित चौटा, आल्हाद सुधांशू हाटे, शौनक विनायक धापटे (सर्व मिडफिल्डर) आणि इक्बाल आसिफ शेख (फॉरवर्ड) या पुण्यातील चार खेळाडूंचा समावेश आहे;
दरम्यान, पुण्याच्याच योगेश पिल्ले यांची संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे आहे.
संघ
गोलरक्षक (३) : साकाश रवी वुक्कडला (मुंबई), साईराज भूषण डोंगळे (कोल्हापूर), हृदय समीर शहा (ठाणे)
बचावपटू (६): मंथन सचिन थापा (मुंबई), एर्विन बेसिल डिसोझा (मुंबई), पार्थ विजय टाळकोकुल (मुंबई), समर्थ बाबासाहेब निकम (कोल्हापूर), स्वरूप अनंत सातूर (कोल्हापूर), अर्शन अय्याज कुमंदन (ठाणे)
मिडफिल्डर (७): रिद्धिमान निरुपम दास (मुंबई), अर्जुन देवेंद्र सिंग (मुंबई), रायन रोनाल्ड परेरा (मुंबई), शौनक समित चौटा (पुणे), आल्हाद सुधांशू हाटे (पुणे), शौनक विनायक धापटे (पुणे), शेख रायन जावेद (जालना)
फॉरवर्ड (६): युवराज संदीप कदम (मुंबई), इक्बाल आसिफ शेख (पुणे), अभिमन्यू मधुकर भोजने (नागपूर), कृष्णराज गुरुदत्त टेमकर (अहमदनगर), लेक्सटन क्रिस्टानंद कोलॅको (पालघर), अंगद कुमार कैलाशचंद यादव (रायगड).
प्रशिक्षक: शृंगार राऊळ (मुंबई); सहाय्यक प्रशिक्षक : योगेश पिल्ले (पुणे)
सामन्यांचे वेळापत्रक (महाराष्ट्र);
३ ऑगस्ट : वि. गोवा
५ ऑगस्ट : वि. झारखंड
७ ऑगस्ट : वि. दिल्ली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading