Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

कोटक महिंद्रा ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडतर्फे कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स फंडाचा शुभारंभ

पुणे: कोटक महिंद्रा ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“केएमएएमसी”/ “कोटक म्युच्युअल फंड”) ने कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स या नवीन फंडाचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. बीएसई पीएसयू निर्देशांकाआधारे वाटचाल करणारा ही फंड योजना प्रामुख्याने मुदत-मुक्त श्रेणीतील योजना आहे. हा फंड 10 जुलै 2024 रोजी गुंतवणूकीसाठी खुला होत असून येत्या 24 जुलै 2024 रोजी बंद होणार आहे.

बीएसई पीएसयू निर्देशांकामध्ये सध्या बीएसई 500 इंडेक्स वनमधून निवडलेल्या 56 पीएसयू समभागांचा समावेश आहे. या निर्देशांकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश असून हे उपक्रम विविध श्रेणींत आहेत. हा फंड गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी किफायतशीर आणि पारदर्शक असा मार्ग उपलब्ध करून देताना  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील गुंतवणूकीत वैविध्यता प्रदान करतो.

नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केएमएएमसीचे  व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश शाह म्हणाले, “कोटक म्युच्युअल फंडात, आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचे विविध पर्याय प्रदान करण्याचा सतत प्रयत्न करतो. कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स फंडाचा शुभारंभ हा वित्तीय गुंतवणूक पर्याय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे संरेखित आहे. हे पर्याय वेगवेगळ्या प्रकारची जोखीम आणि गुंतवणुकीच्या संधी देत गुंतवणूकीचे विश्व पूर्ण करत आहेत. पीएसयू कंपन्यांचे समभाग विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण संधींच्या माध्यमातून संमिश्र असे विश्व सादर करत असताना, कोटकचा हा इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना पीएसयू श्रेणीमध्ये व्यापक गुंतवणूकीची संधी देत आहे. हा फंड पीएसयू गुंतवणुकीसाठी एक आखीवरेखीव दृष्टीकोन प्रदान करतो. त्यामुळे गुंतवणुकदारांना विविधीकरणाद्वारे जोखीम व्यवस्थापित करता येते. तसेच पीएसयू विभागाच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अप्रत्यक्षपणे (पॅसिव्ह) या क्षेत्रात सहभागी होण्याची संधीही देतो.”

कोटक महिंद्रा एएमसी कार्यकारी उपाध्यक्ष आणि निधी व्यवस्थापक देवेंद्र सिंघल या फंडाबाबत टिप्पणी करताना म्हणाले, “भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूकीबाबत स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांना कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स फंड हा गुंतवणूक सेवा पुरवताना आमच्या वित्तीय पर्यायांमध्ये महत्त्वाची भर घालत आहे. ऊर्जा, वित्त, संरक्षण ते पायाभूत सुविधांशी संबंधित असलेल्या  पीएसयू कंपन्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. वैयक्तिक पीएसयू समभाग वेगवेगळी कामगिरी दाखवू शकतात. पण हा निर्देशांक-आधारित दृष्टीकोन गुंतवणूकदारांना सार्वजनिक क्षेत्रात सुरु असलेली वृध्दी आणि सुधारणांचा संभाव्य लाभ घेण्याची आकर्षक  संधी देत आहे. भारत वेगाने आपली आर्थिक वाटचाल करत असून कोटकचा हा फंड गुंतवणूकदारांना तुलनात्मकदृष्ट्या किफायतशीर आणि पद्धतशीरपणे व्यवस्थापित गुंतवणूकीव्दारे या वाटचालीचा साथीदार बनण्याची संधी देत आहे.”

फंडाची भूतकाळातील कामगिरी भविष्यात टिकू शकते किंवा नाही. कोटक बीएसई पीएसयू फंडाच्या अधिक तपशीलांसाठी कृपया भेट द्या: https://www.kotakmf.com

गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading