पिनॅकल इंडस्ट्रीजकडून एडी-जेन अॅम्ब्युलन्स लाँच
पुणे : पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह इंटीरिअर्स, सीटिंग व स्पेशलिटी वेईकल्स कंपनीने आपत्कातीन वैद्यकीय परिवहनामधील नवीन आविष्कार एडी-जेन अॅम्ब्युलन्स लाँच केली आहे. सेमी-प्रीमियम व्हेरिएण्ट एडी-जेन अॅम्ब्युलन्स अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाइन एलीमेंट्सच्या माध्यमातून भारतभरातील रूग्णवाहिकांच्या विद्यमान ताफ्याचे मानक उंचावण्यावर लक्ष केंद्रित करते. हे व्हेरिएण्ट सर्व वेईकल प्लॅटफॉर्म्सवर निर्माण व रूपांतरित करता येऊ शकते.
”एडी-जेन अॅम्ब्युलन्ससह आमचा देशभरात उच्च दर्जाच्या व उपलब्ध होण्याजोग्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे,” असे पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरिहंत मेहता म्हणाले. ”आम्हाला माहित आहे की, अपघातानंतर किंवा वैद्यकीय आपत्तीमध्ये सुरूवातीच्या १० ते २० मिनिटांमध्ये साह्य जीवन व मृत्यूमध्ये बदल घडवून आणू शकते. ही रूग्णवाहिका प्रतिसाद वेळ सानुकूल करण्यासाठी आणि रूग्ण निष्पत्ती सुधारण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.”
रूग्णवाहिका इकोसिस्टम सुधारण्यामध्ये आर्थिक अडचणींचा देखील मोठा अडथळा येतो. फंडिंगमधील कमतरतेमुळे रूग्णवाहिका ताफा अपग्रेड करणे, प्रगत वैद्यकीय उपकरण खरेदी करणे आणि सेवा वितरण व प्रतिसाद वेळ वाढवू शकणाऱ्या तंत्रज्ञान नाविन्यतांची अंमलबजावणी करणे याप्रती लागणाऱ्या पैशांचा तुटवडा जाणवू शकतो.
”याच कारणामुळे आम्ही एडी-जेन अॅम्ब्युलन्स सादर केली आहे. ही रूग्णवाहिका किफायतशीर व उच्च दर्जाच्या वैद्यकीय परिवहन सोल्यूशन्ससंदर्भात गरजेची पूर्तता करते आणि हे सोल्यूशन्स भारतभरातील सरकार, खाजगी आरोग्यसेवा प्रदाते एनजीओ, हेल्थकेअर सेंटर्स, निवासी सोसायटीज आणि व्यावसायिक कार्यस्थळांसाठी प्रखर मानकांची पूर्तता करतात,” असे श्री. अरिहंत मेहता म्हणाले.
डिझाइन आणि कार्यक्षमता
अन्न व किराणा माल डिलिव्हरी अशा इतर क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती झाली असताना देखील वैद्यकीय आपत्ती परिवहन सेवा अनेकदा कमी पडणाऱ्या देशामध्ये या सेमी-प्रीमियम अॅम्ब्युलन्सच्या सादरीकरणामधून प्रबळ आरोग्यसेवा पायाभूत सुविधेसाठी महत्त्वपूर्ण गरज दिसून येते. आपत्ती स्थितीत, अपघातामुळे झालेल्या दुखापतींनंतर किंवा गंभीर संकटानंतर महत्त्वपूर्ण ‘गोल्डन अवर’दरम्यान उत्तमरित्या सुसज्ज रूग्णवाहिका मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम घडवून आणू शकते, शक्यतो जीवन वाचवू शकते.
एडी-जेन अॅम्ब्युलन्सच्या अद्वितीय डिझाइन घटकांबाबत मत व्यक्त करत पिनॅकल इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्री. सचिन देशमुख म्हणाले, ”एडी-जेन अॅम्ब्युलन्सचे सर्वोत्तम वैशिष्ट्य
म्हणजे इम्पॅक्ट रेसिस्टण्स, थर्मल इन्सुलेशन आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑटोमोटिव्ह एबीएस अॅक्रिलोनिट्राइल बुटाडाइन स्टिरिन)चा वापर करत अपग्रेड करण्यात आलेले परिपूर्ण इंटीरिअर. यामधील सिंगल-पीस साइड पॅनेल्स कंपन व आवाज कमी करतात, तसेच सहजपणे साफसफाई व निर्जंतुकीकरणाची खात्री देतात. मटेरिअलचे केमिकल रेसिस्टण्स विविध स्थितींमध्ये टिकाऊपणाची खात्री देते.”
पारंपारिक मजबूतीकरणासह उच्च ताकदीचे अॅल्युमिनिअम रेल्स बसवण्यात आले आहेत, जे वाहनाच्या रचनेबाबत तडजोड न करता उपकरण बसवण्यामध्ये साह्य करतात. हे रेल्स १०जी भार सामावून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थिरता वाढते आणि कंपन-संबंधित जोखीम कमी होतात. युरोपियन प्रमाणित सीट्स त्यांच्या फोल्डेबल डिझाइनसह आरामदायी व सानुकूल स्पेस देतात, ज्याला पूरक असे इंटीरिअर लेआऊट आहे, जे आपत्कालीन कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. भारतातील समकालीन रूग्णवाहिकांच्या तुलनेत ही वेईकल युरोपियन मानकांचे पालन करते. या रूग्णवाहिकेमध्ये रूग्ण, डॉक्टर आणि परिचारिका किंवा रूग्णाचा नातेवाईक सामावू शकतात, तसेच सुधारित स्वच्छतेसाठी कर्टन्स व वॉशबेसिन्स आहेत.
