Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या स्मृति दिनानिमित्त जुनी सांगवीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने सांगवीच्या विकासाचे शिल्पकार माजी महापौर स्व. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या १० व्या स्मृति दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
         हा रोजगार मेळावा अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ०३ या वेळेत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. दहावी- बारावी (पास-नापास), पदवी, आयटीआय, इंजिनिअरिंग धारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी
या गुगल लिंक द्वारे नोंदणी किंवा 9075304042 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उद्योजक अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, प्रशालेचे सचिव प्रणव राव यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading