Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

महिला सक्षमीकरणासाठी ‘प्रोजेक्ट धारा’ ठरणार मैलाचा दगड

पुणे : गरीब आणि वंचित घटकातील महिलांची आर्थिक, आरोग्यदायी परिस्थिती सुधारणे व शाश्वत उपजिवेकसाठी जाॅन्सन कंट्रोल्स आणि पर्णकुटी सामाजिक संस्था यांच्या संयुक्तपणे ‘प्रोजेक्ट धारा’ राबविण्यात येत आहे. जेसीआयच्या स्नेहल पाटील यांच्या अधिपत्याखाली हा प्रोजेक्ट होत आहे.
           महिलांना सर्वांगीण आणि शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये आणि साधनांसह सक्षम करणे हा ‘प्रोजेक्ट धारा’चा उद्देश आहे. यामध्ये व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिलांना नुकतेच टेलरिंग आणि ब्युटी पार्लर किटसारख्या व्यवसाय स्टार्टअप पॅकचे वितरण करण्यात आले. जाॅन्सन कंट्रोल्स इंडियाचे आर्थिक सीओई उपाध्यक्ष मितुल रुस्तगी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्णकुटी सामाजिक संस्थेच्या सह-संस्थापक स्नेहा भारती उपस्थित होत्या.
         यावेळी बोलताना मितुल रुस्तगी म्हणाले, पर्णकुटी’सारख्या समविचारी संस्थांना सोबत घेऊन समाजातील गरीब, गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या समुदायांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे भविष्यातील साधनसंपत्तीसाठी संधी निर्माण करणे शक्य आहे. आमच्या संयुक्तिक प्रयत्नांद्वारे समाजातील उपेक्षित, गरीब घटकाच्या कल्याणाची प्रगती करण्याचा विचार आहे.
          पर्णकुटी एनजीओच्या सह-संस्थापक सुश्री स्नेहा भारती म्हणाल्या की, जॉन्सन कंट्रोल्सच्या पाठिंब्याने गरीब आणि वंचित घटकातील महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येणे शक्य होणार आहे. हा उपक्रम समुद्रातील एका थेंबासमान आहे. आमचं मोठे आणि दीर्घकालीन उद्दिष्ट केवळ आमच्याशी जोडल्या गेलेल्या महिलांना सशक्त करणे नाही, तर मोठ्या प्रमाणावर वंचित समुदायांच्या उत्थानासाठी काम करणे आहे. तसेच त्यांना आत्मनिर्भर, विकासशील आणि उत्पादक समुदायांत सशक्त बनविणे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading