कल्याणीनगर अपघात प्रकरण : ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी मोठी अपडेट
पुणे : कल्याणी नगर येथील पोर्शे गाडी अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट घडली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी अग्रवाल याचे ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकारी सासून मधील डॉक्टर अजय तावरे याला निळंबीत करण्यात आले आहे. तर सासून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
घटना घडल्या नंतर तब्बल आठवडा भरानंतर आल्पवयीने आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा खुलासा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला होता. यासाठी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याने डॉक्टर अजय तावरे याला घटना घडली त्या रात्री 14 व्हाटसअॅप्प कॉल केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आज ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई घटकांबळे आदींना निळंबीत करण्यात आले आहे. तर सासून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी डॉक्टर अजय तावरे यांची आमदार टिंगरे यांच्या शिफारसी नुसार ससूनच्या अधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली होती. मात्र मागे घडलेल्या उंदीर प्रकरणामुळे त्यांना अधीक्षक पदावरून काढण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यास उशीर झाला हे मान्य आहे. मात्र, यापुढे इतर कोणीही अशा प्रकारे फेरफार करू नये म्हणून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
