Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

वडगावशेरी मतदारसंघात पावसाळ्यात पाणी तुंबते त्या ठिकाणच्या नाल्यांची पालिका अधिकऱ्यासमवेत पाहाणी केली…जगदीश मुळीक

पुणे : पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठून पुण्यातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. अनेक ठिकाणी दुर्घटना ही घडतात. त्यासाठी पुण्यातील नाले, ओढे आणि पावसाळी गटारे योग्य वेळी परिणामकारक स्वच्छ होणे गरजेचे आहे. प्रत्येक पावसाळ्याच्या आधी महानगरपालिकेने हे काम करणे आवश्यक आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३ मधीलविविध ओढे आणि नाले यांची आज माजी आमदार जगदीश मुळीक यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी अपूर्ण राहिलेली कामे अत्यंत तातडीने पूर्ण करावीत आणि कुठेही पाणी साठून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी अशी सूचना जगदीश मुळीक यांनी केली.

यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक मुक्ता जगताप, अर्जुन जगताप, महेश गलांडे, पालिका सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, संतोष खांदवे, अदित्य खांदवे, संदिप मोझे, बंटी जंगम, रावसाहेब रखपसारे, प्रताप मोहिते, हे उपस्थित होते.

वडगाव शेरी प्रभाग क्रमांक तीन मधील रामवाडी, साकोरे नगर , विमानननगर, पोरवाल रोड, साठे वस्ती लोहगाव, फिनिक्स मॉल येथील विविध नालांच्या ठिकाणी आज प्रत्यक्ष जाऊन सर्वांनी पाहणी केली. उर्वरित आणि आवश्यक कामे अत्यंत तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे असे श्री जगदीश मुळीक यांनी महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading