Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

भारत अग्रस्‍थानी: स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाने इंजिन व वेईकल उत्‍पादन टप्‍पे साजरे केले

पुणे : स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल)  भारतातील चाकण येथील आपल्‍या अत्‍याधुनिक वेईकल व इंजिन उत्‍पादन केंद्रामध्‍ये मोठ्या उपलब्‍धींना साजरे करत आहे.

स्‍थापनेपासून एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलने भारताच्‍या ऑटोमोटिव्‍ह लँडस्‍केपमध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कंपनीने उल्‍लेखनीय टप्‍पा पार केला आहे, २००९ मध्‍ये चाकण प्‍लांटमधून पहिली कार – स्‍कोडा फॅबिया लाँच केल्‍यापासून १.५ दशलक्षहून अधिक वेईकल्‍सचे उत्‍पादन केले आहे. या उपलब्‍धीमध्‍ये फोक्‍सवॅगन ग्रुपमधील आयकॉनिक मॉडेल्‍सचा समावेश आहे, जसे व्‍हीडब्‍ल्‍यू व्‍हेण्‍टो व पोलो, स्‍कोडा फॅबिया व रॅपिड, तसेच प्रसिद्ध एमक्‍यूबी-एओ-एन प्‍लॅटफॉर्मवर आधारित आधुनिक मॉडेल्‍स – व्‍हीडब्‍ल्‍यू टायगुन व व्‍हर्टस, स्‍कोडा कुशक आणि स्‍लाव्हिया.

गेल्या काही वर्षांमध्‍ये चाकण प्‍लांटमधील इंजिन शॉपने फोक्‍सवॅगन ग्रुपसाठी जागतिक दर्जाचे व उच्‍च कार्यक्षम इंजिन्‍सचे ३००,००० हून अधिक युनिट्सचे उत्‍पादन केले आहे. ही कामगिरी एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलची देशांतर्गत सोर्सिंगप्रती समर्पिततेसह अधिक दृढ झाली आहे, जेथे १.० लीटर टीएसआय इंजिन्‍स भारतातून उत्‍पादित केलेल्‍या कम्‍पोनण्‍ट्सवर अधिक अवलंबून आहेत. ही कटिबद्धता देशाच्‍या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलने ऑटोमेशनप्रती उत्तमरित्‍या संतुलित दृष्टीकोन देखील स्‍थापित केला आहे. कार्यक्षमतेसाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेत कंपनीने मानवी कौशल्‍याचे महत्त्व ओळखले आहे आणि ‘स्किल इंडिया’ उपक्रमाचा फायदा घेत स्‍थानिक टॅलेंटला अधिक निपुण करत आहे.

आपल्‍या यशस्‍वी कामगिरींमध्‍ये अधिक भर करत स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाने लोकप्रिय इंडिया २.० कार श्रेणीसाठी ३००,००० युनिट उत्‍पादनाचा टप्‍पा देखील साजरा केला, जेथे या श्रेणीमध्‍ये व्‍हीडब्‍ल्‍यू टायगुन व व्‍हर्टस, स्‍कोडा कुशक आणि स्‍लाव्हिया या कार्सचा समावेश आहे. भारतासाठी व जगासाठी भारतात उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या या सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार्स आहेत, ज्‍यांना ग्‍लोबल एनसीएपीकडून प्रौढ व्‍यक्‍ती व लहान मुलांसाठी संपूर्ण फाइव्‍ह-स्‍टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

देशांतर्गत उत्‍पादनाव्‍यतिरिक्‍त एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल उत्‍पादन हब म्‍हणून भारताच्‍या जागतिक उपस्थितीप्रती सक्रियपणे योगदान देते. कंपनी आपल्‍या ३० टक्‍क्‍यांहून अधिक कार अभिमानाने निर्यात करते, ज्‍यामधून भारतीय क्षमता आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील दर्जेदार मानक दिसून येतात. ग्रुप ४० हूल अधिक देशांमध्‍ये निर्यात करतो आणि इंडिया-मेड कार्सच्‍या टॉप चार निर्यातदारांमध्‍ये आहे.

 

या टप्‍प्‍यांबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो ए.एस.चे प्रॉडक्‍शन व लॉजिस्टिक्‍ससाठी बोर्ड सदस्‍य अँड्रीस डिक म्‍हणाले, ”आज विकसित होत असलेल्‍या जागतिक स्‍तरावर भारत स्‍कोडा ऑटोच्‍या उत्‍पादन क्षमतेप्रती महत्त्‍वपूर्ण योगदानकर्ता ठरला आहे. स्‍कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने संपादित केलेले टप्‍पे राष्‍ट्रीय सीमांपलीकडे जातात, तसेच त्‍यामधून जागतिक स्‍तरावर सर्वोत्तमता व नाविन्‍यतेप्रती आमची कटिबद्धता सार्थ ठरते. इंजिन शॉपमधील आमची दशकभराची गुंतवणूक आणि चाकण प्‍लांटमधील १.५ दशलक्ष वेईकल्‍सचे उल्‍लेखनीय आऊटपुट यामधून आमच्‍या जागतिक धोरणामधील भारताची महत्त्‍वपूर्ण भूमिका निदर्शनास येते. या उपलब्‍धींमधून आमच्‍या क्षमता, तसेच आमच्‍या विकासगती अधिक पुढे घेऊन जाण्‍यामध्‍ये भारतीय बाजारपेठेची व्‍यापक क्षमता देखील दिसून येते.”

 

स्‍कोडा ऑटो ए.एस.चे टेक्निकल डेव्‍हलपमेंटसाठी बोर्ड सदस्‍य डॉ. जोहान्‍स नेफ्ट म्‍हणाले, ”१.५ दशलक्ष उत्‍पादनाचा टप्‍पा संपादित करण्‍यामधून आमच्‍या भारतातील उत्‍पादन प्‍लांटच्‍या अपवादात्‍मक इंजीनिअरिंग क्षमता दिसून येतात. भारतातील आमचे उच्‍च दर्जाचे आरअँडडी केंद्र नाविन्‍यता व सर्वोत्तमतेला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. जागतिक टीम बहुमूल्‍य माहिती व कौशल्‍याला अधिक महत्त्व देते आणि हे योगदान भारतासाठी व जगासाठी नवीन, अत्‍याधुनिक उत्‍पादने विकसित करण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. यामधून आमच्‍या भारतातील कार्यसंचालनांची ताकद व कल्‍पकता दिसून येते, ज्‍यामुळे आम्‍ही जगभरातील ऑटोमोटिव्‍ह इनोव्‍हेशनच्‍या अग्रस्‍थानी आहोत.”

 

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पियुष अरोरा म्‍हणाले, ”मला आमच्‍या स्‍थानिक लँडस्‍केपमधील या उपलब्‍धींचा अत्‍यंत अभिमान वाटतो. आमच्‍या चाकण प्‍लांटमध्‍ये १.५ दशलक्ष वेईकल्‍सचे मोठे आऊटपुट, तसेच चार यशस्‍वी एमक्‍यूबी मॉडेल्‍सचा उत्‍पादन टप्‍पा आणि आमच्‍या इंजिन शॉपचा १० वर्षांचा प्रवास यामधून भारतातील ऑटोमोटिव्‍ह उद्योगाप्रती आमची समर्पितता, तसेच देशातील टॅलेंट व कर्मचारीवर्गाप्रती एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलचे मोठे योगदान निदर्शनास येते. आम्‍ही भारतातील आमची विस्‍तारीकरण योजना आखत असताना ‘इनोव्‍हेटिंग लोकली, इम्‍पॅक्टिंग ग्‍लोबली’प्रती आमच्‍या मिशनच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत. आमचा भारताचे ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादनासाठी जागतिक हब म्‍हणून स्‍थान अधिक दृढ करण्‍याचा मनुसबा आहे, जो राष्‍ट्रीय मिशन ‘आत्‍मनिर्भर भारत’प्रती संलग्‍न आहे, तसेच समुदायांमध्‍ये विकास व समृद्धतेला चालना देत आहे.”

संशोधन व विकासाला (आरअँडडी) प्राधान्‍य देत, धोरणात्‍मक सहयोग करत आणि टॅलेंट विकासामध्‍ये गुंतवणूक करत एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल भारतीय ऑटोमोटिव्‍ह उद्योगामधील नाविन्‍यता व शाश्‍वततेवर केंद्रित भविष्‍यासाठी पाया घालत आहे. एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल आपल्‍या प्रवासाच्‍या पुढील टप्‍प्‍याकडे वाटचाल करत असताना प्रगतीला चालना देण्‍यासोबत भारतातील भावी गतीशीलतेला आकार देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading