‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न
प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटाच्या टीझर नंतर नुकताच या चित्रपटातील गाण्याचा संगीत अनावरण सोहळा कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला. येत्या ७ जूनला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचे निर्माते फैरोज अनवर माजगावकर, हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून अनिल वहाने आणि सुनील यादव हे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे यांचे आहे.
‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार रत्नागिरीचे सुपुत्र फैरोज माजगावकर, हास्यजत्रा फेम अरुण कदम, संजय खापरे, अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आणि दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांनी हजेरी लावली होती.
या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची तीन गीते आहेत. ‘जगून घेतो आज’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला मंगेश बोरगावकर’ याने स्वरसाज दिला आहे. डॉन्ट वरी या स्फूर्तीदायक गीताला गायिका साक्षी होळकरचा आवाज लाभला आहे. तर ‘राऊडी रजनी डान्स’ हे जोशपूर्ण गाणं ऍलेन के पी आणि बंदना दत्ताने गायलं आहे. संजय नवगिरे आणि प्रशांत जामदार यांनी ही गीते लिहिली आहेत.
गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचेफैरोज अनवर माजगावकर, अमजद हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून अनिल वहाने आणि सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी दिग्दर्शित केला आहे त्याच बरोबर पटकथेची देखील जबाबदारी रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली. अभिनेता संजय खापरे, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अभिनेता अरुण कदम, अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल. साई पियुष,एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.
येत्या ७ जूनला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला विसरू नका.
