Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

SSC Result 2024 : दहावीचा निकाल 27 मे ला

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी (दि. २७) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. मंडळाच्या ‘https://mahresult.nic.in ‘ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading