वारी एनर्जीज लिमिटेड स्टेटक्राफ्ट इंडियाला 445 मेगावॅट सोलर मॉड्युल पुरवणार
मुंबई : सौर PV मॉड्यूल्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून Waaree Energies Limited ओळखली जाते. 30 जून 2023 पर्यंत 12 GW क्षमतेचे सर्वात मोठे मॉड्यूल त्यांनी आतापर्यंत इन्स्टॉल केले आहे. (स्रोत:CRISIL अहवाल) राजस्थानातील बिकानेर येथे एकल-स्थानावरील सौर प्रकल्पांना त्याच्या 540/545Wp ड्युअल ग्लास बायफेशियल मॉड्यूल्सच्या 445 मेगावॅटच्या पुरवठ्यासह ऊर्जा देण्यास सज्ज आहे. मे आणि ऑगस्ट 2024 दरम्यान याची पूर्तता होणार असून हा करार Waaree Energies च्या भारतातील अक्षय्य उर्जेच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणणारा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करतो. ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच देशाच्या निव्वळ शून्य उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी असलेली कंपनीची दूरदृष्टी दर्शवतो.
वारी एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हितेश दोशी यांनी या उपक्रमासंदर्भातील आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. ते म्हणतात, “भारताच्या अक्षय ऊर्जा परिवर्तनात योगदान देण्याच्या आमच्या सामूहिक मोहिमेतील स्टॅटक्राफ्ट इंडियासोबतची ही भागीदारी म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सौरऊर्जा आणि आमच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून, आम्ही केवळ घरेच प्रकाशमान करणार नाही तर या प्रदेशात आर्थिक प्रगतीसाठी आणि रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत. हा प्रकल्प देशांतर्गत उत्पादन, सशक्त समाज आणि भारताला शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीचे आमचे प्रयत्न दाखवतो.”
Waaree चे बायफेशियल सोलर मॉड्युल इथे लावल्याने या भागाची अक्षय ऊर्जा क्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे. त्याहीपलीकडे जात यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणीय शाश्वततेला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. अक्षय उर्जेच्या उद्दिष्टांकडे वाटचाल करत असताना, असे उपक्रम देशाचे हरित भविष्याचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
