बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी बाजी मारली; एका विद्यार्थिनीने पटकावले 100 टक्के गुण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्यात 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. ज्यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी, कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातीलै 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला.
शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषद घेवून अधिकृत रित्या हा निकाल जाहीर केला. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. विभाजनिहाय निकालानुसार कोकण विभागानं यंदा बाजी मारली असून, मुंबईचा निकाल मात्र सर्वाधिक कमी लागल्याचं स्पष्ट झालं.
निकालाची विभागनिहाय आकडेवारी –
कोकण 97.51 %
लातूर 92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %
‘या’ विद्यार्थींनीला मिळाले शंभरपैकी शंभर टक्के
नेहमी प्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी तनिशा सागर बोरामणीकर ही १०० टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल आली आहे. देवगिरी महाविद्यालयाची ही विद्यार्थींनी आहे.
