Tuesday, November 10, 2026
Latest NewsPUNE

२४ ते २६ मे दरम्यान कला स्पंदन आर्ट फेअरचे आयोजन

पुणे : कला क्षेत्रात आपल्या देशात असलेले वैविध्य अनुभविण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकर कलारसिकांना उपलब्ध होणार आहे. इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या वतीने येत्या शुक्रवार दि २४ ते रविवार दि २६ मे दरम्यान वकील नगर डी पी रस्ता येथील सिद्धी बँक्वेट्स येथे दुपारी १२ ते रात्री ९ दरम्यान कला स्पंदन आर्ट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी सर्वांसाठी विनामूल खुली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

कला स्पंदन आर्ट फेअरचे पुण्यातील हे सलग दुसरे वर्षे असून यावर्षीच्या फेअरचे उद्घाटन शुक्रवार दि २४ मे रोजी सायं ५ वाजता रॉयल सुरगाणा प्रिन्सली स्टेटचे महाराज कुमार श्रीमंत महाराज रोहितरावराजे देशमुख पवार आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्या ऑलिव्हिया फर्नांडिस यांच्या उपस्थित संपन्न होईल, अशी माहिती इंडियन आर्ट प्रमोटर्सचे संस्थापक आणि आयोजक सुदीप चक्रवर्ती यांनी कळविली आहे.

या बद्दल अधिक माहिती देताना सुदीप चक्रवर्ती म्हणाले, “कला स्पंदन आर्ट फेअर हे देशातील प्रमुख कला प्रदर्शनापैकी एक असून समकालीन कलेसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनीमध्ये पुणेकरांना जागतिक दर्जाची कला पाहता आणि अनुभविता येईल यासोबतच प्रदर्शनीमध्ये सहभागी कलाकार, कला मास्टर्स यांच्याशी देखील पुणेकरांना थेट संवाद साधला येईल हे ही या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे.”

या कला प्रदर्शनामध्ये व्यावसायिक आणि हौशी कलाकारांनी साकारलेल्या अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज, अलकोहोल इंक आर्ट, वॉटर, ऑईल, अॅक्रॅलिक आणि मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझिन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट, पारंपारिक कला पुणेकरांना अनुभविता येणार आहे. ज्यामध्ये देशभरातील १५० कलाकार आणि कलादालने आपल्या तब्बल १५०० हून अधिक कलाकृती सादर करतील.

Leave a Reply