Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

येस बँक सादर करत आहे येस ग्रँड्युअर: उच्चभ्रू आणि उदयोन्मुख समृद्ध घटकांसाठी प्रीमियर बँकिंग अनुभव

 

पुणे : आपल्या नाविन्यपूर्ण बँकिंग सुविधा उपायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या येस बँकेने येस ग्रँड्युअर हा भारताच्या वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख समृद्ध समाज घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक आणि जीवनशैलीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला एक विशेष बँकिंग कार्यक्रम सादर करण्याची घोषणा केली. BCG CCI प्रोप्रायटरी इन्कम मॉडेलनुसार, पुढील दशकात २.३ पट अपेक्षित वाढीसह आपले वाढते डिस्पोजेबल उत्पन्न आणि अत्याधुनिक ग्राहक सवयींद्वारे चिन्हांकित असा हा समाजघटक भारतातील ग्राहक बँकिंगचे परिक्षेत्र  पुनर्परिभाषित करण्यासाठी तयार आहे. PRICE अहवालानुसार २०४६-४७ पर्यंत भारतीय मध्यमवर्ग जवळजवळ दुप्पट होऊन ६१% पर्यंत पोहोचेल असा अंदाज असताना वाढते उत्पन्न आणि मध्यमवर्गीय आणि उच्च-उत्पन्न विभागांचा विस्तार भविष्यातील सोयीसुविधांना आकार देतील.

उच्चभ्रू वर्ग त्यांच्या जीवनशैलीला अनुरूप वैयक्तिक सेवासुविधा शोधत असताना येस ग्रँड्युअर चे उद्दिष्ट सतत बदलत राहणाऱ्या बाजारपेठेतील गतिशीलता पूर्ण करणे हे आहे. सरासरी मासिक शिल्लक (AMB) ५ लाख रु. किंवा नेट रिलेशनशिप व्हॅल्यू (NRV) २० लाख रु. च्या पात्रता यांसह कर्जविषयक गोष्टी विचारात घेऊन या वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक आधारासाठी बँकिंग अनुभव उंचावण्याकरता येस ग्रँड्युअर आहे.

येस ग्रँड्युअर सुविधेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • बँकिंग फायदे: ग्राहक प्रीमियम सेवा योजनेचा आनंद घेतील. त्यामध्ये समर्पित रिलेशनशीप व्यवस्थापक, बँकिंग सेवांवरील प्राधान्य दर, अनेक शुल्कांमध्ये सूट, लॉकर सुविधांवर लक्षणीय सवलत आणि बचत खात्यासह डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते सादर करणारे विशेष ३ इन १ खाते यांचा समावेश आहे.
  • प्रवासाचे फायदे: येस ग्रँड्युअर डेबिट कार्डवरील शून्य क्रॉस करन्सी मार्कअप शुल्क उत्साही पर्यटन प्रेमी व्यक्तीसाठी आंतरराष्ट्रीय खर्चावरील बचतीसह सोयीसुविधा पुरविते.  येस ग्रँड्युअर डेबिट कार्डसह मिळणाऱ्या इतर विशेष लाभांमध्ये विमानतळावरील विश्रामगृहांमध्ये मोफत प्रवेश आहे.
  • जीवनशैली विशेषाधिकार: या योजनेतून ताज, आयटीसी हॉटेल्स, डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह, ॲमेझॉन, याठिकाणी महत्वपूर्ण आनंददायी जीवनशैली विषयक सुविधांचा लाभ घेता येईल. येस ग्रँड्युअर चित्रपट, जेवण, खरेदी, बिल पेमेंट आणि अशा बऱ्याच इतर वीकेंड खर्चावर ५ पट येस रीवॉर्डस देखील सादर करत आहे.

बारकाईने तयार केलेले लाभ ग्रँड्युअर हे योजनेचे नाव, तिची भव्यता दर्शवतात. या सुविधेचे उद्दिष्ट केवळ सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे नाही तर त्याच वेळी फायदेशीर आणि सर्वसमावेशक असा बँकिंग अनुभव देणे आहे.

या सादरीकरणाबाबत भाष्य करताना, येस बँकेचे कार्यकारी संचालक श्री. राजन पेंटल म्हणाले, “येस ग्रँड्युअर आमच्या विशेष ग्राहकांना अतुलनीय बँकिंग अनुभव आणि वैशिष्ट्यपूर्ण  विशेषाधिकार देण्यासाठी असलेली आमची अतूट बांधिलकी अधोरेखित करते. उच्चभ्रू आणि उदयोन्मुख समृद्ध कुटुंबांच्या विकसित गरजा समजून घेऊन, येस ग्रँड्युअरने वैयक्तिक बँकिंगमध्ये एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. या क्षेत्रात प्रथमच अशा वैशिष्ट्यांवर भर देण्यात आला आहे. येस बँकेमध्ये आम्ही अपेक्षांना खरे उतरण्यासाठी आणि भारतातील बँकिंगच्या परिक्षेत्राला पुन्हा परिभाषित करण्यासाठी समर्पित आहोत.”

यापुढे जाऊन येस बँक ग्राहकांचा बँकिंग अनुभव उंचावण्यासाठी डायनॅमिक डिजिटल सोल्यूशन्स सादर करते. येस बँकेचे नेक्स्ट-जेन मोबाइल बँकिंग ॲप – आयरिस, अखंड विनाअडथळा बँकिंगसाठी १०० हून अधिक वैशिष्ट्ये आणि सेवा देते. येस पे नेक्स्ट हे यूपीआय, बिल पेमेंट, रिचार्ज, गिफ्ट कार्ड्स आणि इतर अनेक गोष्टींसाठी एक समग्र पेमेंट ॲप म्हणून काम करते. ग्राहकांना एआय सक्षम वैयक्तिक बँकिंग चॅट सहाय्य आणि नेट बँकिंग सुविधेवर सुलभ आणि सुरक्षित बँकिंगचा आनंद घेण्यासाठी देखील प्रोत्साहित केले जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading