Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

अ. भा. मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना ‘कला गौरव पुरस्कार’ जाहीर

 

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त देण्यात येणारा ‘कला गौरव पुरस्कार’ यंदा महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी (१९ मे) सायंकाळी ६.०० वाजता कै. गोळवलकर मैदान (गोल मैदान) यशवंत नगर, तळेगाव दाभाडे स्टेशन येथे आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार, तर नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नितीन शहा व नाट्य परिषदेचे आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा या मराठी व हिंदी गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मावळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सुरेश धोत्रे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading