सुरत पोलिसांनी नरसीतून तरुणाला उचलले पाकिस्तानातील व्हॉटस्प ग्रुपवर आढळली गंभीर चॅटिंग
नांदेड : देशविघातक कृत्य करणाऱ्या पाकिस्तानमधील एका व्हॉटस्प ग्रुपशी संबंध असल्याच्या संशयावरून नादेड जिल्ह्यातील नरसी येथील शेख शकील शेख सत्तार या १८ वर्षीय तरुणास सुरत (गुजरात) घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुरत ‘क्राईम ब्रँच’चे एक पथक रविवार दि. १२ मे रोजी नांदेडमध्ये आले होते. सुरत आणि नांदेड पोलिसांच्या टीमने संयुक्तरित्या तपास करताना नरसी येथील शेख शकील शेख सत्तार यास आणि आणखी एकास ताब्यात घेतले होते. शेख शकील याचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर सुरत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन
व्हॉटस्प ग्रुपवर काही चॅटिंग मिळाल्यानंतर सुरतचे पोलीस नांदेडमध्ये आले होते. त्यांना तपासात नांदेड पोलिसांनी सहकार्य केले. नरसी येथील एका तरुणास ताब्यात घेऊन ते पोलीस सुरतला गेले.
जैश बाबा राजपूत या नावाने एक व्हॉटस्अप ग्रुप असून पाकिस्तानातील वकास व सर्फराज डोगर हे दोघे या ग्रुपचे अॅडमिन आहेत. या ग्रुपमध्ये सुरत येथील सोहेल टिमोल व बिहार येथील शहनाज हे दोघे सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील शेख शकील शेख सत्तार हा देखील या ग्रुपचा सदस्य आहे. या आरोपींनी सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, तेलंगणातील हिंदुत्ववादी नेते आ. राजासिंग, सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सुदेश चव्हाणके आणि नुपूर शर्मा या चौघांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच या व्हॉटस्अप ग्रुपवर काही गंभीर चॅटिंग देखील आढळून आले.
यामध्ये परदेशातून शस्त्रे आयात करणे संबंधी काही चॅटिंग सुरत पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यानंतर या प्रकरणात सुरत येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
