विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, वित्त व लेखा अधिकारी श्रीमती. चारूशिला गायके, संचालक व विभाग प्रमुख डॉ. विलास आढाव, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, श्री. मयुर चोरडीया, श्री. मनोहर कुंजीर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भारतीय कामगार सेनेच्यावतीने जयंतीचे औचित्य साधत कुलगुरू यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
