Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

…अन् त्याने भाजी मार्केटमध्ये पत्नीला पेटवले

किनवट : पत्नी सासरी नांदायला येत नाही, हा राग मनात धरून पतीने भर दिवसा भाजी मार्केटमध्ये स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान गोकुंदा येथून भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मंडईमध्ये आली – होती. भाजीपाला, मसाले व अन्य – दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून ती महिला भाजीपाला घेऊन घराकडे परतत असतांना, तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते हा आपल्या दुचाकीवरून सोनपापडीच्या डब्यात पेट्रोल घेऊन आला होता आणि त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

या घटनेत ती महिला चांगलीच भाजली आहे. प्रसंगावधान राखत आजुबाजूच्या व्यापाऱ्यांनी पाणी ओतून महिलेला वाचविले. या घटनेनंतर आरोपी अर्जुन दुचाकीवरून फरार झाला. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर बऱ्याच उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोकुंदा उपजिल्हा

रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलीस वाहनातून जळीत महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. साप्पाललेल्या महिलेस तीन अपत्य असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जळीत महिलेची तब्येत

खालावल्याने रात्री उशिरा तिला आदिलाबादला हलविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन आरोपी अर्जुन सातपुतेला शिताफीने ताब्यात घेतले. फ प्रियंका अर्जुन सातपुतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, तेलंगणातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे सीमेवरील चेकपोस्टना अचानक भेट देऊन पाहणी करण्यासाठी या भागात आले असता, ही घटना कळाल्यानंतर त्यांनी किनवट पो.स्टे. भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading