विद्यापीठात स्मृती दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे अभिवादन करण्यात आले. विद्यापीठातील शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमात प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, भाषा व साहित्य प्रशाळेचे संचालक प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, उपकुलसचिव श्री. ज्ञानेश्वर साळुंके यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
