Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव डॉ. अमोल कोल्हेनी आखला आहे; आढळराव पाटलांचा आरोप

पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात  दावे प्रतिदावे आणि उत्तर प्रत्युत्तर सुरुच असल्याचं दिसत आहे. एकमेकांना वेगवेगळे आव्हान देताना दिसत आहेत. त्यावरुन आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.  मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव डॉ. अमोल कोल्हेनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात, असा आरोप आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर  केला आहे.

‘मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात. असं म्हणत शिवाजी आढळरावांनी मी यापुढं कोल्हेंना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिरूर लोकसभेतील प्रश्न संसदेत मांडताना आढळरावांनी पंधरा वर्षे केवळ त्यांच्या कंपनीचं हित जोपासलं, असा आरोप कोल्हेनी केला. मग आढळराव चांगलेच संतापले. कोल्हेंनी आरोपांचे पुरावे द्यावे, मी लोकसभेतून माघार घेतो अन्यथा त्यांनी निवडणुकीतुन माघार घ्यावी. आढळरावांचं हे आव्हान कोल्हेनी स्वीकारलं. त्यानंतर आढळरावांनी कोल्हेंचा ऐंशी टक्के खासदार निधी परत गेल्याचा आरोप केला. आता आढळरावांनी याचे पुरावे द्यावेत अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी, असं प्रतिआव्हान दिलं. त्यानंतर आढळरावांनी मात्र हे आव्हान स्वीकारण्याऐवजी कोल्हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवण्याचा कोल्हेंचा डाव आहे. मी उत्तरं देऊ शकत नाही, असं ते जनतेला दाखवू इच्छितात. त्यामुळं यापुढं मी त्यांना प्रतिउत्तर देणार नाही, अशी  भूमिका आढळराव पाटलांनी घेतली आहे.

दरम्यान, आढळराव पाटील अन् अमोल कोल्हे दोघेही प्रत्येक सभेत एकमेकांवर विविध मुद्द्यांवर टीका करताना दिसतात. आता प्रचाराच्या शेवटच्या टप्यात कोणते मुद्दे चर्चेत येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading