Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

कलश यात्रेने ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सप्ताहाला प्रारंभ

पुणे : श्रीगौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर यांच्या वतीने श्री चारभूजा मन्दिर कोथरुड द्वितीय पाटमहोत्सव निमीत्ताने ने श्री राधाकृष्ण  स्वामी महाराज यांच्या अमोघ वाणीने  ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ’ साप्ताहचे आयोजन वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी – कोंढवा रोड येथे करण्यात आले आहे, अशी माहिती या सप्ताहाचे आयोजक ‘श्री गौड ब्राह्मण समाज श्री चतुश्रुंगी मंडळा’च्या पदाधिकाऱ्यानी दिली.

सप्ताहामध्ये श्रद्ध्येय श्री. राधाकृष्णजी महाराज यांच्या अमोघ वाणीतून आज कथेला सुरुवात झाली. तत्पूर्वी श्री आई माता मंदिर ते वर्धमान सांस्कृतिक भवन दरम्यान भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो स्त्रियांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी समाज बंधू व कथा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ‘श्री’चे विराट रूप तथा ध्रुव चरित्र, तिसऱ्या दिवशी श्री प्रल्हाद चरित्र व गजेंद्र मोक्ष, चौथ्या दिवशी श्री वामन अवतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव, पाचव्या दिवशी श्रीकृष्णाची बाललीला, श्रीगोवर्धन पूजा, सहाव्या दिवशी रुख्मिणी विवाह महोत्सव व सुदामा चरित्र तर शेवटच्या दिवशी नावयोगेश्वर संवाद अशाप्रकारे सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.

 ‘युवागोष्टी’ या संवादमय कार्यक्रम अयोजन

रविवारी (५ मे) श्री. श्रद्ध्येय श्री. राधाकृष्णजी महाराज “युवा गोष्टी”या सवन्दत्माक उपक्रमात  युवक आणि युवतींशी सकाळी १० ते १२ या वेळात संवाद साधणार आहेत. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन श्री गौड ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गौड समाजच्या सर्व बंधू व भगिनी  युवक युवती प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading