Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

एस. एस. राजमौली आणि डिस्नी+ हॉटस्टार बाहुबलीची सांगितली न गेलेली कथा

बाहुबली ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फँटसी फ्रँचायझींपैकी एक आहे. ती फक्त एक कथा नाही तर एक विश्वास आहे. बाहुबलीच्या जगात अनेक कधीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या अभूतपूर्व घटना घडतात. डिस्नी+ हॉटस्टार यांनी हॉटस्टार स्पेशल बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड, या सिनेमाचा प्रिक्वेल आणला आहे. यात बाहुबली आणि भल्लालदेव त्‍यांच्‍यासाठी
सर्वात मोठा धोका असलेला क्रूर सरदार रक्तदेवापासून महान महिष्मती साम्राज्याचा आणि राजसिंहासनाचा बचाव करण्यासाठी एकत्र येतात. ग्राफिक इंडिया आणि अर्का मीडियाची निर्मिती असलेली बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड महान निर्माते एस. एस. राजमौली, शरद देवराजन आणि शोभू यर्लागड्डा यांची कलाकृती आहे. त्याचे दिग्दर्शन जीवन जे. कांग आणि नवीन जॉन यांनी केले आहे. या महाकथेतून प्रेक्षकांना महाकाव्य साहस, बंधुता, विश्वासघात, संघर्ष आणि वीरतेची न सांगण्‍यात आलेली कथा अनुभवण्‍यासोबत बाहुबलीचे अॅनिमेटेड युग पाहायला मिळेल. ही पॉवर पॅक्ड मालिका १७ मे २०२४ पासून डिस्नी+ हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
डिस्नी+ हॉटस्टारचे कंटेंट प्रमुख आणि एएमपी; एचएसएम एंटरटेनमेंट नेटवर्क, डिस्ने स्टार गौरव बॅनर्जी म्हणाले की, “आम्हाला बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड खास प्रदर्शित करताना खूप आनंद होत आहे. समकालीन कथाकथनात एनिमेशनची अत्यंत महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन आम्ही बाहुबली आणि लिजेंड ऑफ हनुमानसारख्या रोमांचक कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी
वचनबद्ध आहोत. आमचे ध्येय प्रौढ आणि स्वारस्य असलेल्या प्रेक्षकांसाठी एनिमेशनचे रूप अधिकाधिक समृद्ध करण्याचे आणि त्यासोबत ग्राफिक इंडियासोबत आमची भागीदारी विस्तारित करण्याचे आहे.”
बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लडचे संकल्पक आणि निर्माते एस. एस. राजमौली म्हणाले की, “बाहुबलीचे जग खूप व्यापक आहे आणि ही फिल्म फ्रँचायझी त्याची एक उत्तम ओळख होती. परंतु अजूनही शोधण्यासारखे बरेच काही आहे आणि तिथेच बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड चित्रात येते. ही कथा बाहुबली आणि भल्लालदेव यांच्या आयुष्यातील अनेक ट्विस्ट्स समोर आणेल आणि
त्याचबरोबर एक विसरले गेलेले सिक्रेटही येईल. कारण या दोघांना मिळून महिष्मतीला वाचवावे लागेल. बाहूच्या चाहत्यांसाठी हे एक नवीन कथानक आणताना तसेच ही गोष्ट एनिमेटेड स्वरूपात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यामुळे बाहुबलीच्या जगाला एक नवीन आणि आकर्षक रूप मिळेल. अर्का मीडियावर्क्स आणि मला शरद देवराजन, डिस्ने+ हॉटस्टार आणि
ग्राफिक इंडिया यांच्यासोबत भारतीय एनिमेशनला मुलांसोबतच इतरांसाठीही आणताना खूप आनंद होत आहे.”
बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लडचे सहनिर्माते, लेखक आणि निर्माते शरद देवराजन म्हणाले की,  एस. एस. राजमौली यांची खास कथाकथनाची शैली आणि आगळ्यावेगळ्या बाहुबली फिल्म्सनी भारतभरातील लाखो चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला आकर्षित केले आहे. त्यांनी अनेक पिढ्यांसाठी भारतीय मनोरंजनाचे रूप पालटले आहे. ते जगातील सर्वांत महान निर्मात्यांपैकी एक आहेत आणि या नवीन कधीही न सांगितल्या गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी त्यांच्यासोबत व अर्का मीडियावर्क्ससोबत काम करणे हे स्वप्न सत्यात उतरणे आहे. बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड ही एक एनिमेटेड एक्शनने भरपूर कथा असून त्यात राजकीय सूड, नाट्य, धोका, युद्ध, हिरोइझम, निष्ठा आणि साहस हे सर्वच आहे. हा गौरव बॅनर्जी यांच्यासोबतचा आणि डिस्ने+ हॉटस्टारसोबतचा लिजेंड
ऑफ हनुमाननंतरचा माझा दुसरा एनिमेशन प्रोजेक्ट आहे. ते ग्राफिक इंडियामध्ये आमच्यासाठी एक उत्तम भागीदार ठरले आहेत. आम्ही संपूर्ण देशासाठी हे पथदर्शक नवीन प्रौढ एनिमेटेड शोज आणणार आहोत.
यशस्वी ठरलेल्या बाहुबली चित्रपटात बाहुबलीची भूमिका करणारा अभिनेता प्रभास म्हणाला की, “भल्लालदेव आणि बाहुबली या बाहुबलीच्या अभूतपूर्व प्रकरणात एकत्र येणार आहेत, ही रोमांचक गोष्ट आहे. बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड ही कथा चित्रपटात घडलेल्या कथेच्या आधी घडलेली आहे. हा बाहू आणि भल्लाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. एस. एस. राजमौली, शरद देवराजन, डिस्ने+ हॉटस्टार, अर्का मीडियावर्क्स आणि ग्राफिक इंडिया हे सर्व मिळून ही कथा एनिमेटेड स्वरूपात जगासमोर आणत आहेत. बाहुबलीच्या प्रवासातली ही गोष्ट पाहण्यासाठी मी खूप आतुर आहे.”
बाहुबलीमध्ये भल्लालदेवची भूमिका करणाऱ्या राणा दगुबट्टीने सांगितले की, ;बाहुबलीच्या चित्रपटाने एक इतिहास रचला आहे. हा इतिहास एनिमेटेड कथाकथनाद्वारे पुढे नेला जातोय हे पाहून मला खूप आनंद होत आहे. बाहुबली आणि भल्लालदेवाच्या आयुष्यातल्या या नवीन प्रकरणामुळे बाहुबलीच्या जगातल्या अनेक रहस्यमय गोष्टी पुढे येतील. एस. एस. राजमौली, शरद देवराजन, डिस्नी+ हॉटस्टार, अर्का मीडियावर्क्स आणि ग्राफिक इंडिया हे सगळे मिळून बाहुबलीच्या जगातला हा नवीन धडा एनिमेटेड स्वरूपात आणत आहेत म्हणून मला खूप आनंद वाटतोय. त्यामुळे बाहुबलीचे जग चाहत्यांसाठी आणि नवनवीन प्रेक्षकांसाठी आणखी रोमांचक पद्धतीने खुले होईल.”
~ पहा बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लडसोबत एक्शन आणि ड्रामा फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर १७ मे २०२४ पासून ~

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading