Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

पुणे  : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी तर दुसरी ७ मे रोजी तर तिसरी तपासणी ११ मे २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात सभागृह क्रमांक ३, चौथा मजला, बी वींग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे-४११००१ येथे खर्च तपासणी करण्यात येणार आहे. पहिली तपासणी २ मे रोजी, दुसरी तपासणी ६ मे आणि तिसरी तपासणी १० मे २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. खर्च तपासणी सभागृह क्रमांक ३, चौथा मजला, बी वींग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे-४११००१ येथे करण्यात येणार आहे. पहिली तपासणी ३ मे रोजी, दुसरी तपासणी ७ मे आणि तिसरी तपासणी ११ मे २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading