आपल्या करिअरचा नव्याने आरंभ करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सकृत EKA द्वारे नोकरभरती मोहिमेचे आयोजन
पुणे : पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सकृत EKA ने करिअरमधून अवकाश घेतल्यानंतर पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यास सज्ज असलेल्या महिलांना पाठबळ देण्याचे लक्ष्य समोर ठेवत एका खास वॉक-इन सेवाभरती मोहिमेची घोषणा केली आहे. आपल्या #EvolutioNari चळवळीचा एक भाग म्हणून पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. करिअर ब्रेकवर असलेल्या महिलांना तसेच एक व्यावसायिक कर्मचारी म्हणून आपले करिअर नव्याने सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांना पाठबळ पुरविण्याप्रती कटिबद्ध आहे.
ही सेवाभरती मोहीम अर्थात रिक्रूटमेंट ड्राइव्ह २७ एप्रिल २०२४ रोजी साई राधे कॉम्प्लेक्स, ऑफिस क्र. जी१०१, हॉटेल शेरेटन ग्रॅण्डच्या मागे, पुणे ४११००५ येथे आयोजित केली जाणार आहे. करिअरमधून काही काळासाठी विश्रांती घेतलेल्या महिलांची त्यांच्या कौशल्यांना व अनुभवाला साजेशा नोकऱ्यांच्या संधींशी गाठ घालून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
या सेवाभरती मोहिमेच्या माध्यमातून पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सकृत EKA एक समावेशक आणि विविधतापूर्ण कामाचे ठिकाण उभारण्याप्रती आपली बांधिलकी जपत आहे. महिलांना त्यांच्या करिअरसाठी सक्षम बनविण्याप्रती, त्यासाठी त्यांना पाठबळ पुरविण्याप्रती कंपनीची समर्पित भावना या उपक्रमामध्ये प्रतिबिंबित झाली आहे.
डिप्लोमा, बीई, बी.टे. एमई, एम.टेक किंवा एमबीए किंवा समतुल्य पदवी प्राप्त असणाऱ्या महिलांना ही आगळीवेगळी संधी आजमावण्यास प्रोत्साहन दिले जाते. विविध व्यवसायांची पार्श्वभूमी असलेल्या ज्या महिलांनी कुटुंब सांभाळणे किंवा प्रियजनांची काळजी घेणे यांसारख्या वैयक्तिक कारणांसाठी नोकरीमधून काही काळ उसंत घेतली असेल अशा महिलांना या करिअर रिस्टार्ट मोहिमेत सहभागी होऊन विविध विभागांमध्ये उपलब्ध पदांचा शोध घेण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
हा सेवाभरती उपक्रम R&D विभागासाठी Creo, BIW, होमोलोगेशन, स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्समधील कौशल्य, SCM विभागासाठी व्हेंडर डेव्हलपमेंट, पर्चेसिंग आणि बाईंग या विषयातील तज्ज्ञत्व, सेल्स व मार्केटिंग विभागातील पदांसाठी उत्तम संवादकौशल्य आणि इंटरपर्सनल कौशल्ये तसेच प्रोडक्शन विभागातील पदांसाठी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या महिलांचे स्वागत करत आहे. क्वालिटी अश्युअरन्स विभागासाठी क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम (QMS), सप्लायर क्वालिटी अश्युरन्स (SQA) आणि इन-प्रोसेस क्वालिटी चेक्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तर फायनान्स विभागासाठी SAP, GST, अकाउंट्स पेयेबल (AP), अकाउंट्स रिसीव्हेबल (AR) आणि इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टॅण्डर्ड्स (IFRS)ची ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सकृत EKA चे ग्रुप प्रेसिडंट अरिहंत मेहता म्हणाले, “स्त्रीची चिकाटी आणि तिची महत्त्वाकांक्षा यांचा उत्सव साजरा करत असताना आपली व्यावसायिक वाटचाल नव्या उत्साहाने सुरू करण्यास तयार असलेल्या महिलांना सस्नेह आमंत्रण देत असल्याचा पिनॅकल इंडस्ट्रीजला अभिमान आहे. आमची सेवाभरती मोहीम केवळ नोकरीवर नियुक्त करून घेण्यापुरती नाही; तर महिलांनी त्यांच्या क्षमतांना आपलेसे करावे आणि मनुष्यबळामध्ये अर्थपूर्ण योगदान द्यावे यासाठी त्यांना सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न आहे. आमची कंपनी कामाच्या ठिकाणचे आश्वासक वातावरण आणि वैयक्तिक प्रगतीसाठीच्या संधी पुरविण्याशी बांधील आहे. सर्वांच्याच फायद्याची ठरेल असे सर्वोत्कृष्टतेच्या तत्वावर आधारलेली संस्कृती तयार करण्यासाठी कंपनी विविधता, समानता आणि समावेशकता या मूल्यांची जपणूक करते.”
ही सेवाभरती मोहीम आपल्या करिअरची नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या महिलांना एक आगळीवेगळी संधी देते. यात सहभागी होऊन तुम्हाला एक संभाव्य नोकरी शोधता येईलच, पण त्याचबरोबर मनुष्यबळातील महिलांना सक्षम करण्यासाठी समर्पित चळवळीचा भाग बनण्याची संधीही त्यांना मिळेल. या उपक्रमासाठी नावनोंदणी करण्याकरिता कृपया या लिंकवर (Link) उपलब्ध फॉर्म भरा – किंवा QR कोड स्कॅन करा आणि आताच नावनोंदणी करा!
