Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात 27 लाखांची रोख रक्कम पकडली

पुणे: वाकड – हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान ( Wakad)  निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम पकडली आहे. ही कारवाई काल रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मतदार संघात राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. यात नाकाबंदी करण्यात येत आहे.स्कोडा गाडीतून ही रक्कम आली होती, संबधीत इसम रक्कम कोठून आणली हे सांगू शकलेला नाही, पोलिसांनी आयकर विभागात रीतसर कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading