अमित शहा यांच्या सभेसाठी पोलिसांनी पोलिसांनी कायदा चुलीत टाकला- बच्चू कडू यांचा गंभीर आरोप
अमरावती : प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या सभेला परवानही असताना देखील ऐनवेळी केवळ देशाचे गृहमंत्री यांच्या सभेसाठी परवानगी नसताना देखील आचार संहितेचा भंग करून अमरावती पोलिसांनी सभेचे मैदान भाजपला दिले असल्याचा प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे.
हे कळताच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू सायन्सकोर मैदानात दाखल झाले. अन् या प्रकारा विषयी अमरावती पोलिसांना जाब विचारून फैलावर घेतले. इतकेच नव्हे तर मैदानाची परवानगी दिल्याचे पत्र पोलिसांसमोरच फाडून फेकून दिले.
माध्यमाशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, शांतता ठेवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र हेच पोलिस भाजपच्या भाडोत्री कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत. सायन्सकोर मैदानात 23, 24 ला सभा घेण्याची परवानगी आम्हाला 18 एप्रिललाच मिळाली आहे. मात्र तरी देखील येथील पोलिसांनी आमची कायदेशीर परवानगीला पायदळी तुडवून राणा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आम्हाला न् कळवता ते राणांना परवानगी कशी देतात? गृहामंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांनी आचार संहितेचा भंग करून कायदा चुलीत टाकला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, आज आम्हाला हे मैदान ताब्यात मिळणार होते. त्यासाठी आम्ही पहाणीसाठी आलो असता, आम्हाला पोलिसांनी आडवले. तेव्हा आम्हाला कळाले की आमच्याकडे लिखित परवानगी असून देखील हे मैदान भाजपच्या सभेसाठी दिले आहे. येथील पोलिसांनी कायद्याच उल्लघन केले असून; पोलिसांची आवस्था ब्रिटीश काळातील पोलिसांसारखी झाली असल्याचा आरोप केला आहे.
अमित शहांनी दुसरीकडे सभा घ्यावी
गृहमंत्री अमित शहा यांची अमरावतीत सभा होवू नये, असं आमच म्हणण नाही. पण आम्हाला सभेची परववाणगी मिळाली असताना ती डावलून भाजपला केवळ राजकीय दबावापोटी सभेसाठी लेखी परवानगी नसतानाही मैदान ताब्यात देणे हे कायदेशीर रित्या चुकीचे आहे. आणि आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे उद्या अमित शहांनी या ठिकाणी सभा घेवू नये, दुसऱ्या ठिकाण मैदान घ्यावे.
