Wednesday, November 11, 2026
BusinessLatest News

डॉ. सीताराम जिंदाल यांचा भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मानाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : परोपकार आणि आरोग्यसेवेतील दूरदर्शी प्रणेते डॉ. सीताराम जिंदाल यांना सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मानाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा समारंभ म्हणजे डॉ. जिंदाल यांच्या समाजाप्रती अतुलनीय योगदानाची दखल घेणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता.

हरियाणातील नलवा या शांत गावात १२ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेल्या डॉ. सीताराम जिंदाल यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. जिंदाल ॲल्युमिनियम लिमिटेड (जेएएल) चे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांचे  उद्योजकीय कुशाग्र कौशल्य भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियम निर्माण उत्पादक म्हणून घडविण्यात  मोलाचे ठरले आहे. असे असूनही त्यांचा दृष्टीकोन व्यवसायाच्या पलीकडे जाणारा आहे. त्यांच्या योगदानातून  एस. जिंदाल चॅरिटेबल फाऊंडेशन, असंख्य ट्रस्ट, रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालये यांची स्थापना झाली असून त्यातून कल्याणकारी सेवांप्रती असलेली त्यांची अतूट बांधिलकी दिसून येते.

डॉ. जिंदाल यांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे ते कलकत्ता विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी १९५७ मध्ये बॅचलर पदवी मिळवली. त्यानंतर निसर्गोपचारात डॉक्टरेट मिळवली. महाविद्यालयीन जीवनात एक जीवन बदलवून  टाकणारा अनुभव त्यांना आला. उपवास, एनीमा आणि योगा यांच्या मदतीने पोटाच्या क्षयरोगाच्या वरकरणी बरी होऊच शकणार नाही अशा परीस्थितीवर त्यांनी मात केली. त्यातून विनाऔषध उपचार याविषयी त्यांची जिज्ञासा वाढली. याच उत्कटतेतून १९७९ मध्ये बंगलोरमध्ये जिंदाल नेचरक्युअर इन्स्टिट्यूट (JNI) ची स्थापना करण्यात आली. या संस्थेने तीव्र आणि जुनाट आजारांवर उपचार करण्याच्या मानवतावादी दृष्टिकोनासाठी जागतिक ख्याती मिळवली. त्या वेळी प्रचलित असलेल्या पारंपरिक निसर्गोपचार उपचारांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने डॉ. जिंदाल यांनी या दुर्लक्षित असलेल्या शास्त्राचे आधुनिकीकरण आणि नवीनीकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

डॉ. जिंदाल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, जेएनआय हे दमा आणि मधुमेहापासून ते संधिवात आणि अगदी कर्करोगाच्या काही विशिष्ट आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठीचे एक जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र बनले  आहे. संपूर्ण वर्षभर ५५० बेड्स असलेली ही संस्था जगभरात औषधमुक्त उपचार पर्याय शोधणाऱ्यांसाठी आशेचा किरण म्हणून काम करत आहे. डॉ. जिंदाल यांचे महत्त्वपूर्ण योगदान ‘डिटॉक्सिफिकेशन’ च्या नावीन्यपूर्णतेत आणि ही उपचार पद्धती सादर करण्यात आहे. ‘डिटॉक्सिफिकेशन’ ही एक अत्यंत प्रभावी औषधविरहित प्रक्रिया आहे जी वैज्ञानिकदृष्ट्या आणि सुरक्षितपणे शरीरातील विविध यंत्रणा प्रणाली स्वच्छ करते. या नवीन उपचार पद्धतीने प्रतिबंधात्मक काळजी, प्रतिबंध आणि अनेक रोग बरे करण्यामध्ये क्रांती घडवून आणली आहे.

Leave a Reply