पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राधिका परांजपे
पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन येथील पीवायसी हिंदू जिमखाना येथे नुकतीच पार पडली. त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राधिका परांजपे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२४-२५ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारीणीची घोषणा यावेळी करण्यात आली. डॉ. राधिका परांजपे यांनी अध्यक्ष पदाचा कार्यभार यावेळी स्विकारला. डॉ. अश्विनी मिसाळ यांनी सचिव तर डॉ. वृषाली वरद यांची कोषाध्यक्ष पदी निवड झाली.
तसेच, डॉ. प्रणव राडकर, डॉ. रोहिणी मराठे, डॉ. संगीता वाघ, डॉ. प्रांजली थरकुडे, डॉ. धीरज सुराणा, डॉ. त्रिशला बर्डे, डॉ. श्वेता मराठे, आणि डॉ.आरती हेडा यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.
