Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Lok Sabha Election 2024 : राणा जगजितसिंह पाटलांचे ओमराजे निंबाळकरांच्या टीकेला उत्तर

धाराशिव : एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा आहे. एका रुग्णांवर अनेक ‘शस्त्रक्रिया’ नाही तर अनेकदा ‘उपचार’ झाले आहेत. एकतर त्याला काही कळत नसेल किंवा पुन्हा खोटं बोलत असेल, अशा शब्दात भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचे पारंपारीक प्रतीस्पर्धी असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

भाजपच्या काळात 2012मध्ये 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या तर 2016मध्ये 16 लोकांवर 138 शस्त्रक्रिया झाल्या. तसेच 2014मध्ये 9 रुग्णांवर 80 शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माहाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता. त्याला आज राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, आपण शस्त्रक्रिया असा शब्द वापरत नाही तर उपचार असा शब्द वापरतो. समजा मी किडनीचा पेशंट आहे, तर मला आठवड्याला डायलिसिस करावं लागतं. जर माझ्यावर दहा वेळा डायलसीस झाले तर माझ्यावर दहावेळा शस्त्रक्रिया झाली असं म्हणायचं का? ओमराजे यांना यातलं काही कळत नाही, तो माणूस खोटं बोलतोय, अशी टीका राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading