Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महायुती आणखी मजबूत; मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रायगड : महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव व कॉँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अ‍ॅड. विलास नाईक यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला. अंतुले यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशाने रायगडमध्ये महायुतीची यांकड वाढणार आहे.  

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले मुश्ताक अंतुले यांची ओळख अल्पसंख्याक चेहरा अशी आहे. मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे रायगड लोकसभा मतदार संघातील खासदार सुनील तटकरे यांना अधिक बळ मिळणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे (उबाठा)  उमेदवार अनंत गीते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अल्पसंख्याक समुदाय राष्ट्रवाडीवर महायुतीत सामील झाल्याने नाराज असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्या समाजाला छेद देण्याचे काम अंतुले यांचा पक्ष प्रवेश करेल, असे मत रायगड येथील लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.  मात्र शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे. बॅ. ए. आर अंतुले यांच्यामुळे राज्यमंत्री हे पद महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्माण झाले. देशातील पहिली कर्जमाफी अंतुले यांनी ७ कोटी रुपयांची केली होती. शिवाय आमदारांना कायमची निवासस्थाने मिळाली. आमदारांचा प्रोटोकॉल आणि स्थान बळकट करण्याचे काम बॅरिस्टर अंतुले यांनी त्यावेळी केले. असे वलयांकित नेतृत्व अंतुले यांच्यारुपाने महाराष्ट्राने पाहिले आहे असेही तटकरे म्हणाले. 

पक्ष प्रवेशावेळी ‘महायुतीच्या रुपाने महाराष्ट्रात विकास करण्याची शक्ती उभी राहिली आहे. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे’, अशा भावना मुश्ताक अंतुले यांनी व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, मुश्ताक अंतुले, ए.आर. अंतुले यांचे जावई. अंतुले हेही नावाजलेले नेते आहेत. मुश्ताक अंतुले दीर्घकाळ राजकारणात आहेत. ते पंजाब नॅशनल बँकेचे माजी संचालक आहेत. मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजित यांचा गट आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading