Sunday, September 20, 2026
Latest NewsSports

एआय एक्सचेंज करंडक : आर्यन्स् स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा विजयाचा चौकार; ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा दुहेरी विजय

पहिली ‘एआय एक्सचेंज करंडक’ १३ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा

पुणे : ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘एआय एक्सचेंज करंडक’ १३ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् स्पोटर्स अ‍ॅकॅडमी संघाने सलग चौथा विजय मिळवला. ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.येवलेवाडी येथील कै. बापुसाहेब शेलार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्टिफन शिरोडकर याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने अरेना ५५ क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १४५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने २५ षटकामध्ये २१६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये रूद्र पाबळे (४१ धावा), स्वराज मोरे (३६ धावा), ओजस कडाडी (२६ धावा) आणि स्टिफन शिरोडकर (२० धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या आव्हानासमोर अरेना ५५ क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ७१ धावांवर आटोपला. स्टिफन शिरोडकर याने ९ धावात ३ तर, विराज कबाडी याने ३ धावात ३ गडी बाद केले.

दुसर्‍या सामन्यात अर्णव कडु याने फटकावलेल्या ८१ धावांच्या जोरावर आर्यन्स् स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने एके स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा ५२ धावांनी सहज पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. पहिल्यांदा खेळताना अर्णव कडू (८१ धावा) आणि समर्थ साठे (नाबाद ३२ धावा) यांच्या फलंदाजीमुळे आर्यन्स् स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने १७४ धावांचे लक्ष्य उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना एके स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा डाव १२२ धावांवर मर्यादित राहीला. एके संघाकडून सोहम सावंत याने नाबाद ६९ धावांची खेळी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद २१६ धावा (रूद्र पाबळे ४१, स्वराज मोरे ३६, ओजस कडाडी २६, स्टिफन शिरोडकर २०, इशान माळी १-२१) वि.वि. अरेना ५५ क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २२.४ षटकात १० गडी बाद ७१ धावा (कुलदीप बिष्णोई १८, स्टिफन शिरोडकर ३-९, विराज कबाडी ३-३); सामनावीरः स्टिफन शिरोडकर;

आर्यन्स् स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ४ गडी बाद १७४ धावा (अर्णव कडू ८१ (५६, १४ चौकार), समर्थ साठे नाबाद ३२, शौर्य अंकुश १-२०) वि.वि. एके स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ८ गडी बाद १२२ धावा (सोहम सावंत नाबाद ६९ (८२, १२ चौकार), अमित पुजारी २-१५, सार्थ बदाडे २-१५); सामनावीरः अर्णव कडू.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading