Sunday, September 20, 2026
Latest NewsSports

दुसरी डॉक्टर्स प्रिमिअल लीग : साऊथ दिल्ली मेडीकल असोसिएशन, दिल्ली चॅम्पियन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत 

पुणे : यंग डॉक्टर्स लीग तर्फे आयोजित दुसर्‍या ‘डॉक्टर्स प्रिमिअल लीग’ राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत साऊथ दिल्ली मेडीकल असोसिएशन आणि दिल्ली चॅम्पियन्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना आणि मुंढवा येथील लिजंड्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात कुश चौधरी याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे साऊथ दिल्ली मेडीकल असोसिएशनने ठाणे सुपबर्सचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ठाणे सुपबर्स संघाने १३० धावा धावफलकावर लावल्या.  तपन दास याने नाबाद ४५ धावा आणि सचिन पाटील याने २६ धावा करून संघाचा डाव सावरला. कुश चौधरी आणि अनुज यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे आव्हान साऊथ दिल्ली मेडीकल असोसिएशनने १६.१ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. कुश चौधरी याने ४० धावांची तर, सिध्दांत नरूला याने नाबाद ४९ धावांची खेळी केली व संघाचा विजय साकार केला.

सिसील माथुर याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली चॅम्पियन्स्ने उदयपुर डॉक्टर्स क्रिकेट क्लबचा ४९ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना दिल्ली चॅम्पियन्स्ने १८९ धावांचे आव्हान उभे केले. दक्क्ष पवार (४३ धावा), शंतनु नागपाल (३३ धावा), मनोज चौधरी (३३ धावा) आणि हरींदर कुंडू (३० धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर उदयपुर डॉक्टर्स क्रिकेट क्लबचा डाव १४० धावांवर मर्यादित राहीला. अधीर यादव याने ५१ धावांची खेळी केली. सिसील माथुर याने ३३ धावात ३ गडी बाद केले. प्रशांत बाळु आणि हरींदर कुंडू यांनी अचूक गोलंदाजीसह संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
ठाणे सुपबर्सः २० षटकात ९ गडी बाद १३० धावा (तपन दास नाबाद ४५, सचिन पाटील २६, कुश चौधरी २-२१, अनुज यादव २-२२) पराभूत वि. साऊथ दिल्ली मेडीकल असोसिएशनः १६.१ षटकात ३ गडी बाद १३३ धावा (कुश चौधरी ४०, सिध्दांत नरूला नाबाद ४९, वरूण म्हात्रे १-२३); सामनावीरः कुश चौधरी;

दिल्ली चॅम्पियन्स्ः २० षटकात ८ गडी बाद १८९ धावा (दक्क्ष पवार ४३, शंतनु नागपाल ३३, मनोज चौधरी ३३, हरींदर कुंडू ३०, डिन विझली २-२८) वि.वि. उदयपुर डॉक्टर्स क्रिकेट क्लबः १९.३ षटकात १० गडी बाद १४० धावा (अधीर यादव ५१ (४०, ५ चौकार, ३ षटकार), धिनो सी. २१, गगन नायर २१, सिसील माथुर ३-३३, प्रशांत बाळु ३-२४, हरींदर कुंडू २-११); सामनावीरः सिसील माथुर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading