Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल – डॉ. अमोल कोल्हे

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी, माता भगिनींच्या सन्मानासाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी अविरतपणे संघर्ष करत आहे. या संघर्षाला मायबाप जनतेचं पाठबळ नक्की मिळेल, हा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. 

शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर डॉ. कोल्हे बोलत होते.  यावेळी खा.सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री  बाळासाहेब थोरात साहेब, माजी राज्यमंत्री  विश्वजित कदम, आ.अशोकबापु पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, माजी आ. महादेव बाबर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बंधू  श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित दादांचे पुतणे  युगेंद्र पवार आदी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. मतदारांनी मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading