fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पिंपळे गुरवमध्ये रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरवमधील शोभा सामाजिक संस्था, आदियाल स्पोर्ट क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 जयंती समिती, बुद्धभूषण सेवा संघ यांच्या संयुक्तपणे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
              या शिबिराचे उद्घाटन आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, बुद्धभूषण सेवा संघाचे अध्यक्ष रोकडे, युक्त प्रवक्त संघ हरीश गायकवाड, अभय नरवडेकर, सामाजिक कार्यकर्ते श्याम जगताप, तानाजी जवळकर, नरेश जगताप, रमेश काशीद, नितीन कदम, चंद्रकांत वाकडे, राहुल काकडे, शंतनू डोळस, गणेश जगताप, विनोद धुमाळ, नितीन काशीद, रोहिदास जगताप, सोमनाथ जगताप, उद्योजक महेंद्रसिंग आदियाल, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, उषाताई मुंडे, वैशालीताई जवळकर, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, राजू लोखंडे, लक्ष्मी आदियाल, मीनाताई जंगम, दुर्गा आलियाल, स्वाती जाधव, राजश्री जाधव,  मिलिंद कंक, उद्योजक माऊली जगताप, दीपक जवळकर, विष्णू शेळके, पिजन जगताप आदी उपस्थित होते.
            या शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोनशेजणांनी ब्लडग्रुप तपासून घेतला. नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शंभर वर्षे वयाच्या आजींनी या शिबिरात आपले डोळे तपासून घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading