Saturday, September 19, 2026
Latest NewsPUNE

अपनी प्रजाहित पार्टीची पुणे लोकसभेची उमेदवारी हेमंत पाटील यांना – सचिन पाटील 

पुणे : पुणे लोकसभेसाठी अपनी प्रजाहित पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगत, भाजप आणि कॉँग्रेसच्या उमेदवाराला तोंडिसतोड देण्यासाठी पुण्यात इंडिया अगेंस्ट करप्शनचे  राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे पक्षाचे उमेदवार असतील अशी माहिती अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी हेमंत पाटील,  अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय महासचिव गजानन शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना सचिन पाटील म्हणाले, पुणे लोकसभेची उमेदवारी ऐतिहासिक असल्यामुळे आमचे राज्यातील आणि पुण्यातील कार्यकर्ते हेमंत पाटील यांना  निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. पुणे लोकसभा मतदारसंघात अनेक अडकाहणी, आगरिबांवर अन्याय होत आहे. पुण्यात आयटी हब असताना स्थानिक लोकांना रोजगार मियलात नाही, व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात  हेमंत पाटील यशस्वी ठरतील असा विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला. 

गजानन शिरसाट म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार मैदानात उतरवणार आहोत. पुणे, बारामती, सातारा, माढा, कोल्हापूर सह कोकण आणि मुंबईत आमचे उमेदवार असतील.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading