देशातील प्रतिष्ठेच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीगचा पुना लाइन्स संघ विजेता
पुणे : ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आयोजीत ऑक्सफर्ड गोल्फ लीगचा अंतिम सामन्याच्या दिवस अतिशय चुरशीचा आणि रोमांचकारी असा ठरला . या सामन्यात पुना लायन्स ने बाजी मारत ऑक्सफर्ड गोल्फ चषकावर आपले नाव कोरले. सॉफ्टसेल स्विंगर्स ने 9 गुण मिळवले तर पुना लाइन्स 10 गुण मिळवित विजयावर शिक्कामोर्तब केले. या संघाचे राजीव पुसाळकर आणि अँड्रो पिंटो सह विजयी संघाच्या खेळाडूंना यावर्षीचा ऑक्सफर्ड गोल्फ चषक सांयकाळी दिमाखदार अशा सोहळ्यात गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ क्लबचे अनिल सेवलेकर व एस. गोल्फिंगचे आदित्य मालपणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दुसरा क्रमांकाचे मानकरी सॉफ्टसेल स्विंगर्स हा संघ ठरला तर तिसरा संघ ईगल फोर्सेस आणि चौथा क्रमांकाचे परितोषक झिंगर्स या संघाला देण्यात आले. याबरोबरच दहा लाखाचे बक्षीस ही देण्यात आले. तसेच सौरभ रॉय या खेळाडूस लीगचा सर्वोउत्कृष्ठ खेळाडू हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. या लीगमध्ये देशभरातील सुमारे बारा संघ सहभागी झाले होते. इगल फोर्सेस ,शुब्बान सनराइजेस ,ऐस.जे. सुलतान ऑफ स्विंग ,रोरिंग टायगर्स नागपूर ,पुना लायन्स ,द लीजन्सी क्लब ,विंग वॉरियर्स ,ग्रीन ग्लॅडिएटर्स ,दुबई फाल्कन यांचा समावेश होता. एका संघामध्ये पंधरा खेळाडू सहभागी झाले होते. आठ संघामध्ये एकूण १२० देशभरातील नामांकित खेळाडू सहभाग घेऊन खेळत होते. देशातील सर्वात नयनरम्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा ऑक्सफर्ड गोल्फ क्लब मध्ये ही स्पर्धा पार पडली.
आठ दिवस ही लीग पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब मध्ये अतिशय उत्सहात पार पडली. आज त्याचा अंतिम सामना होऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले. पुढील वर्षी अजून देशभरातील जास्तीत जास्त खेळाडू आणि संघ सहभागी करुन घेण्यात येणार असून हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांना सहभागी करुन घेणार असल्याचे या लीगचे मुख्य आयोजक आणि गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट चे संचालक अनिल सेवलेकर यांनी यावेळी सांगितले. यावर्षीची लीग ही अतिशय उत्कृष्ठ झाली असून देशभरातील अनेक खेळाडू सहभागी झाल्याने एस. गोल्फिंगचे आदित्य मालपणी यांनी सर्व खेळाडूंचे आभार मानले.
