Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

भोसरीतून आढळराव पाटील यांना लाखाचे मताधिक्य देणार – आमदार महेश लांडगे 

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द सर्वोत्तम असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागू या. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा चे अधिकचे मताधिक्य मिळवून कही देण्याची जबाबदारी माझी, असे  प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश  लांडगे यांनी केले.

वाघोली  येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजर पदाधिकाऱ्यांची सा समन्वय बैठक घेतली. या वेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडरसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे, आदींसह शिरूर लोकसभेतील भावपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. खासदार अमोल कोल्हे या मतदारसंघात कधी फिरकले नाहीत. याउलट शिवाजी आढळराव यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात जास्तीत जास्त कामे केली आहेत.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमुळे भोसरी व जुनर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली व हडपसरमधील भाजप कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याने शिवाजीराव आढळराव यांना अधिक बळ मिळण्यास फायदा होणार आहे. दख्यान, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याचे वचन सर्व पदाधिकान्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading