Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

कर्वेनगरात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा उत्साहात संपन्न

पुणे: कर्वेनगर येथे सकल हिंदू समाज तर्फे भव्य शोभायात्रा हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत गुढी पाडव्यानिमित्त सकल हिंदू समाज तर्फे कर्वेनगर येथे मंगळवार ९ एप्रिल रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.शोभायात्रेचे थीम समर्थ भारत हे होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून संध्याकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या शोभायात्रेत पारंपरिक वेषात अनेक नागरिक सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी झाले. ताल मृदुंगाच्या तालावर पावली खेळणारी वारकरी,इस्कॉनचे हरे रामा- हरे कृष्णा च्या तालावर नृत्य करणारे कार्यकर्ते, वातावरणात मांगल्य आणणारे शंख वादन, पारंपरिक मराठमोळ्यातील वेशातील चिमुकले,वेशभूषे सह अश्वारूढ बाल शिवाजी, खंडोबा, आसमंत निनादून टाकणारा तरुणाईने केलेला जय श्रीराम चा जयघोष,अशा मंगलमय वातावरणात हिंदू संस्कृती दर्शनातून नववर्षाचे स्वागत कर्वेनगर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.
महर्षि कर्वे स्री शिक्षण संस्था, भजनी मंडळे,अध्यात्मिक समूह, गणेश मंडळे,विविध सोसायट्या,नवरात्र उत्सव मंडळे, सामाजिक प्रतिष्ठान, इस्कॉन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, मनशक्ती केंद्र,महिलाश्रम संस्था, वासुदेव, गोंधळी, वारकरी दिंडी, शाहू लक्ष्मी पथकाचे लाठीकाठी, तलवार, दांडपट्टयाचे प्रात्यक्षिक, हिंदुत्ववादी संघटना, समर्थ भारताचे दर्शन घडविणारा चित्ररथ,शंख पथका सह तरुण तरुणी, नागरिक महिला सहभागी झाले होत्या. शोभायात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती.
शोभायात्रा कॅनॉल रोड मार्गे विकास मित्रमंडळ चौक, मिनल कॉर्नर,स्पेंसर चौक, यामार्गाने जाऊन विठ्ठल मंदिर येथे समारोप झाला. तेथे महाआरती व महाप्रसाद वाटप झाले.
कर्वेनगर मधील नागरिकांनी श्रीराम रथावर पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे उस्फुर्त स्वागत केले. शोभायात्रेत तरुण वर्गासह सुमारे १००० नागरिक सहकुटुंब सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading