बर्फात आढळला उंदीर; पुण्यात चालय तरी काय ?
पुणे : समोसामध्ये कंडोम मिळाल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आता बर्फामध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे. ऐन उन्हाळ्यात शीतपेयामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फामध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याने पुणेकरांचे आरोग्य आता राम भरोसे असल्याचे दिसत आहे.
कालच पुण्यातील औंध मधील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोसामध्ये कंडोम आणि माती आढळून आली होती. त्यानंतर आज लगेच दुसऱ्या दिवशी जुन्नर तालुक्यात ही घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक शीतपेयांना प्राधान्य देतात. त्यात बहुतांश वेळा बर्फ टाकला जातो. मग तो ऊसाचा रस असो किंवा सरबत अनेकदा तो बर्फ चांगला नसल्याचे समोर आले आहे. आज ही जुन्नर येथे शीतपेयात टाकण्यासाठी आणलेल्या बर्फात हा उंदीर आढळून आला असून त्याचा विडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
बर्फात आढळला उंदीर,
पुण्यात चाललंय तरी काय?#Pune #Food #Maharashtra #Ice pic.twitter.com/a7ykIxC4gk— Pallavi Gaikwad (@pallavig585) April 10, 2024
