Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

पुण्यातील जोशी वडेवाले यांनी मिळवला वडापाव श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार

पुणे : स्विगी या भारतातल्या आघाडीच्या प्लॅटफॉर्मने त्यांच्या पहिल्यावहिल्या स्विगी रेस्टॉरंट अवॉर्ड्सची घोषणा केली आहे. ही घोषणा पुणे शहरातील रेस्टॉरंटसाठी करण्यात आली आहे. पुण्यातील १ लाखापेक्षा अधिक युजर्सने २५ प्रवर्गांसाठी त्यांचां प्राधान्यक्रम सांगितला. हा सोहळा अतिशय यशस्वी ठरला. पुण्यातली समृद्ध खाद्यपरंपरेचा हा उत्सव चांगलाच रंगला. विविध खाद्यप्रकारांवर पुणेकरांचं किती प्रेम आहे हे त्यांनी दिलेल्या मतांवरूनच लक्षात येते.

बिर्याणी, पिझ्झा, आईसक्रीम, वडापाव, चायनीज, केक, डेझर्ट रोल्स आणि इतर प्रवर्गात युजर्सने १,१४,५५७ मतं दिली. पुणेकरांना त्यांच्या आवडत्या खाद्यस्थळांबद्दल किती आस्था आहे हे यावरून लक्षात येते. अरोमाज हैदराबाद हाऊसच्या बिर्याणीला सगळ्यात जास्त मतं मिळाली. पिझ्झा प्रवर्गात डॉमिनोज पिझ्झा सर्वांत लोकप्रिय ठरला. त्यांना सर्वाधिक मतं मिळाली. जोशी वडेवाले यांचा वडापावही खाद्यप्रेमींचा अतिशय आवडता ठरला तर चायनीज पदार्थांसाठी किमलिंगला सर्वाधिक मतं मिळाली. किमलिंग हे तिथल्या विविधांगी पदार्थासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. हे पुरस्कार म्हणजे फक्त रेस्टॉरंटसाठी नाहीत, तर यातून पुण्यातल्या खाद्य संस्कृतीची झलक पहायला मिळते. त्यात ३५,000 उत्साही युजर्सने मतं दिली. फुड डिलिव्हरीसाठी टॉप कॅटेगिरीमधील विजेते रेस्टॉंरंट खालीलप्रमाणे आहेत.

बिर्याणी– अरोमाज हैदराबाद हाऊस, तिरंगा, बेहरोझ बिर्याणी

पिझ्झा– डॉमिनोज पिझ्झा, पिझ्झा हट, ओव्हन स्टोरी पिझ्झा,- स्टँडआऊट टॉपिंग्स

बर्गर- मॅकडोनाल्ड्ज बर्गर, बर्गर किंग, केएफसी- फ्राईड चिकन अँड बर्गर्स

आईसक्रीम– नॅचरल आईसक्रीम, बस्किन रॉबिन्स- आईसक्रीम डेझर्ट्स, एनआयसी आईसक्रीम्स

वडापाव– जोशी वडेवाले, गार्डन वडापाव सेंटर, एस कुमार वडेवाले

चायनीज– किमलिंग, द चायनीज वर्क, अंकल्स चायनीज

केक्स आणि डेझर्ट-  ला चेरी चीझकेकस्, थिओब्रोमा, द बेल्जिअन वॅफल कं

रोल्स– रोल्स मॅनिया, फासोझ, रॅप्स, रोल्स आणि श्वार्मा, कॅफे अरेबिया

जोशी वडेवाले, पुणे चे मालक सुरज दत्तात्रय शेलार हे या स्पर्धेतील विजेते आहेत. या यशाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “सर्वोत्कृष्ट वडापाव हा पुरस्कार जिंकणे हा माझा सन्मान समजतो. उत्तम चवीचा वडापाव ग्राहकापर्यंत नेटाने पोहोचवल्याबद्दल मी स्विगीचे आभार मानतो. वडा पाव तयार करणाऱ्या आमच्या कष्टाळू टीमचे मी आभार मानतो आणि अर्थातच आमच्या ग्राहकांचे ज्यांनी आम्हाला सतत पाठिंबा दिला. आम्ही या सन्मानासाठी खरोखर आभारी आहोत आणि आम्ही अशीच सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading