मातंग समाजाला उमेदवारी दिली नसल्याच्या निषेधार्थ लहुजी परिवर्तन आघाडी राज्यभर उमेदवार उभे करणार
पुणे : महाराष्ट्र राज्यात पाच राखीव मतदार संघ आहेत .परंतु सर्वच पक्षांनी मातंग समाजाला एकही उमेदवारी दिली नाही याचा निषेध म्हणून राज्यभरात विविध ठिकाणी मातंग समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात पुण्यातून पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव संजय केंदळे तर हातकणंगले मतदारसंघातून लक्ष्मण तांदळे यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचे लहुजी परिवर्तन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकासभाऊ सातारकर यांनी जाहीर केले .
या पत्रकार परिषदेस दीपक कसबे ,ललित ससाणे ,संतोष घोलप ,निलेश वाघमारे उपस्थित होते .
पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून संजय लक्ष्मण केंदळे याचे नाव जाहीर करण्यात येत आहे. त्याच्या मागील सामाजिक चळवळीचा अनुभव पाहता ते पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे व अण्णाभाऊ जयंती मोहत्सवाचे सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. दलित स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव म्हणून सध्या माथाडी कामगार संघर्ष सेनेच्या जनरल सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेत.
तसेच कोल्हापूर हातकंगणे लोकसभा मतदार संघातून मा.लक्ष्मण (तात्या) तांदळे यांची उमेदवारी लहुजी परिवर्तन आघाडी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे. लक्ष्मण तांदळे हे बी.ए. मध्ये पदवीधर आहेत. व गेली २५ ते ३० वर्ष सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये ते सक्रिय आहेत. लहुजी
संघर्ष सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी कोल्हापूर मध्ये शेतकरी व कामगार आंदोलनामध्ये अनेकवेळा सहभाग घेतलेला आहे. त्याची दाखल घेवून पुणे जिल्हा, पुणे शहर मातंग समाजाच्या वतीने त्यांना २०२२ मध्ये फकीरा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेला आहे.
