Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

कोटक सिक्युरिटीज, एनआयएसएमतर्फे आर्थिक साक्षरता उपक्रमाव्दारे 68 हजार तरुणांना प्रशिक्षण

मुंबई : कोटक सिक्युरिटीज लिमिटेड (केएसएल) ने वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट (NISM) च्या सहकार्याने “कोना कोना शिक्षा” उपक्रमाद्वारे देशातील सुमारे 68 हजारांहून अधिक तरुण भारतीयांना आर्थिकदृष्ट्या साक्षर केले आहे. देशातील तरुणांमध्ये आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी जुलै 2021 पासून “कोना कोना शिक्षा” हा सीएसआर उपक्रम सुरू करण्यात आला होता.

एनआयएसएमने उपक्रमाच्या स्थापनेपासून 480 शहरांमधील 1700 हून अधिक महाविद्यालयांमध्ये आत्तापर्यंत  2626 कार्यक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमात 303 तज्ज्ञांच्या सहकार्याने 2 लाख 11 हजार 955 विद्यार्थ्यांपर्यंत आर्थिक साक्षरतेची संकल्पना पोहोचवण्यात आली आहे.

एनआयएसएम – केएसएलचे सीएसआर नॉलेज पार्टनर आणि प्रोजेक्ट मॅनेजर हे “कोना कोना शिक्षा” उपक्रमातून आर्थिक साक्षरतेची माहिती देतात. भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि तरुण भारतीयांना ऑनलाइन मॉड्यूलद्वारे प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक साक्षर केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक साक्षरतेबाबत दहा तासांचे सविस्तर आणि सखोल प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे एनआयएसएमव्दारे ऑनलाइन मूल्यांकनही केले जाते, तसेच प्रमाणपत्रही दिले जाते.

“कोना कोना शिक्षा” उपक्रम विद्यार्थ्यांना व्यक्तिगत गुंतवणूक, शेअर बाजारात गुंतवणुकीची मूलभूत पध्दत, गुंतवणुकीची तत्त्वे आणि पद्धती आदींबाबत ज्ञान देऊन सक्षम करते. आर्थिकदृष्ट्या ज्ञानसंपन्न आणि कुशल तरुणांची पिढी तयार करणे आणि वित्तीय सेवा उद्योगात त्यांना करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे हे केएसएलच्या सीएलआर प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

एनआयएसएमचे संचालक अश्वनी भाटिया उपक्रमाबाबत बोलताना म्हणाले,  “तरुण नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता या जनजागृती उपक्रमासाठी कोटक सिक्युरिटीजशी संलग्न झाल्याबद्दल NISM ला आनंद होत आहे. अनेक तरुण व्यावसायिकांना गुंतवणूक आणि शेअरबाजार, त्याची संस्थात्मक चौकट आणि त्यातील मध्यस्थ घटक व त्यांची कार्यप्रणाली आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या आर्थिक सेवा आदी विषय समजून घेण्यात या उपक्रमाने मोलाची मदत केली आहे. संपूर्ण भारतात अशा कार्यक्रमांची प्रचंड गरज आहे. आम्हाला खात्री आहे की, या आर्थिक वर्षात हा उपक्रम अधिक शहरांमध्ये आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.”

कोटक सिक्युरिटीजचे अध्यक्ष एस. ए. नारायण म्हणाले, “ “कोना कोना शिक्षा उपक्रमाचे यश हे प्रामुख्याने संख्याबळावर अवलंबून आहे. दरवर्षी आम्ही अधिकाधिक तरुण भारतीयांपर्यंत पोहोचत आहोत आणि त्यांच्यात आर्थिक साक्षरतेची पाळेमुळे घट्ट करत आहोत. त्यांना वित्तीय दृष्ट्या जाणकार व्यक्ती बनण्यास सक्षम करत आहोत. NISM च्या सहकार्याने आम्ही सुरू केलेल्या वाटचालीचा महत्त्वपूर्ण प्रभाव समाजात निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी आम्हाला तो प्रेरणा देत आहे.’’

उपक्रमात सहभागी घटकांकडून मिळालेला अभिप्राय आतापर्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक होता. “कोना कोना शिक्षा” व्यतिरिक्त, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (KEF) च्या सहकार्याने कोटक सिक्युरिटीज शिक्षण आणि उपजीविका यावर आधारीत विविध सीएसआर प्रकल्प राबवत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading