Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

१९वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत योगेश सोनावनेची सुवर्णपदकाची हॅटट्रिक

पुणे : पंचकुला, हरयाणा येथे सुरु असलेल्या १९व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत दुस-या दिवशी महाराष्ट्रायोगेश सोनावने याने स्पर्धेमधील सुवर्णपदकाची हॅटट्रिक साध्य केली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी एकूण ४ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकासह पदक तालिकेत अव्वल क्रमांक राखल आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक १ सुवर्ण ५ रौप्य आणि २ कांस्यपदकासह दुस-या स्थानावर आहे. ३४ गुणांसह महाराष्ट्र गुणतालीकेतही अव्वल स्थानी असून २८ गुणांसह कर्नाटक दुस-या स्थानी आहे. (Yogesh Sonavane’s hat-trick of gold medals at the 19th National Mountain Bike Cycling Championships)


आज झालेल्या ज्युनिअर गटातील मिक्स्ड रीले प्रकारात महाराष्ट्राच्या हर्षद पाटील, योगेश सोनावने, मनाली रत्नोजी आणि सुजाता वाघेरे यांच्या संघाने १ ता. १९ मि ४९.९७२ से. वेळ नोंदवताना या प्रकारात महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध केले. तब्बल सहा मिनीटांनी शर्यत पुर्ण करणा-या कर्नाटकच्या संघाने १ ता. २५ मि ५३.११९ से. वेळ देत रौप्य तर १ ता. ४१ मि. २३.९७९ से. वेळ देत केरळने कांस्य पदक मिळवले. मुलांच्या सब ज्युनिअर वयोगटात महाराष्ट्राच्या योगेश सोनावने याने या स्पर्धेमधील आपले तिसरे सुवर्ण पदक पटकावताना एक्ससीओ (क्रॉस कंट्री ऑलल्पिक) प्रकारात ५१ मि ०५.१९० से. वेळ देत सुवर्णपदक मिळवले.
प. बंगालच्या सत्यदिप याने ५४ मि. ४२.२१७ से वेळेसह रौप्य तर हिमाचल प्रदेशच्या युगल ठाकुर याने ५५ मि. २२.६८४ वेळेसह कांस्य पदक मिळवले. मुलींच्या सब ज्युनिअर वयोगटात श्रावनी परीटने एक्ससीओ (क्रॉस कंट्री ऑलल्पिक) प्रकारात ५४ मि ३९.४३६ से वेळेसह महाराष्ट्राल रौप्य पदक मिळवून दिले. या प्रकारात उत्तराखंडच्या अवनी दरयाल ने सुवर्ण तर तामिळनाडूच्या सोंबारनिका ने कांस्यपदक मिळवले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading