Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

पहिल्या ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २६ मार्चपासून आयोजन !!

पुणे : ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ मार्च ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर होणार आहे. (1st ‘SA Ajinkyapad Karandak’ Under 12 Boys Interclub T20 Cricket Tournament organized from 26th March)
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक शराफत अली शहा यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या आंतरक्लब स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यची संधी मिळणार आहे. लाल चेंडूवर होणार्‍या या स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार आहेत.
स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी, एएसजी क्रिकेट अकॅडमी, ब्रिलियंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गायकवाड क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सहारा क्रिकेट अ‍ॅकॅडमी, अरेना ५५ क्रिकेट अ‍ॅकॅडमी, अष्टपैलु क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एसजी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, शराफत क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी, योगेश क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुणे पोलिस बॉईज हे संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ३५ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला २० हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना रोख पारितोषिक आणि करंडक मिळणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी आणि एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमी या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading