Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

दादाज् इलेव्हन, नायर ईगल्स् संघांची विजयी कामगिरी !!

पुणे :  लायन्स् इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ तर्फे आयोजित १४ व्या ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत दादाज् इलेव्हन आणि नायर ईगल्स् संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत समीर तांबोळी याच्या अष्टपैलु खेळीमुळे दादाज् इलेव्हन संघाने कोकणे स्टार्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कोकणे स्टार्सने १७५ धावांचे आव्हान उभे केले. गुलाब चव्हाण याने ७० धावांची तर, योगेश भोंगळे याने नाबाद ५८ धावांची खेळी केली. हे आव्हान दादाज् इलेव्हनने १८.४ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. समीर तांबोळी याने ४४ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला विजय निंबाळकर (२६ धावा) आणि दिग्वीजय मोहीते (२४ धावा) यांनी मोलाची साथ दिली व संघाचा विजय सोपा केला.

धीरज कदम याच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर नायर ईगल्स् संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियस्ने १२९ धावा धावफलकावर लावल्या. हे लक्ष्य नायर ईगल्स्ने १३.५ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. राहुल कामठे याने नाबाद ६१ धावांची तर, धीरज कदम याने ५६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कोकणे स्टार्सः २० षटकात ५ गडी बाद १७५ धावा (गुलाब चव्हाण ७० (५३, ७ चौकार, २ षटकार), योगेश भोंगळे नाबाद ५८ (४२, ७ चौकार), कुणाल शिंदे २३, समीर तांबोळी २-३४) पराभूत वि. दादाज् इलेव्हनः १८.४ षटकात ७ गडी बाद १७८ धावा (समीर तांबोळी ४४ (१८, ५ चौकार, ३ षटकार), विजय निंबाळकर २६, दिग्वीजय मोहीते २४, अविनाश बारणे २-२१, कुणाल शिंदे २-३०); सामनावीरः समीर तांबोळी;

न्युट्रीलिशियस्ः २० षटकात ७ गडी बाद १२९ धावा (जय रे ४०, शैलेश देशपांडे २२, सचिन थोपटे नाबाद २०, दिलीप मॅथ्यु २-१०) पराभूत वि. नायर ईगल्स्ः १३.५ षटकात २ गडी बाद १३० धावा (राहुल कामठे नाबाद ६१ (४०, ११ चौकार), धीरज कदम ५६ (३५, ९ चौकार, १ षटकार); सामनावीरः धीरज कदम;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading