Saturday, June 6, 2026

Day: March 20, 2024

ENTERTAINMENTLatest News

सोनी मराठी वाहिनीवर पहिल्यांदाच होणार रंगपंचमी महासंगम!

  सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. नवीन मालिका, नवे  महाएपिसोड, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण हे सगळं सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता लवकरच होळी आणि रंगपंचमी येणार आहेत. त्याची सर्वत्र धूम आहेच, पण होळी आणि रंगपंचमी यांचे निमित्त साधून सोनी मराठीदेखील प्रेक्षकांसाठी विशेष असं काही घेऊन येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर रंगपंचमी महासंगम पहिल्यांदाच होणार आहे. महासंगम म्हणजेच सोनी मराठीवरील सगळ्यांच मालिकांतील प्रेक्षकांना आवडणार्‍या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. सोनी मराठीवर पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहे. नेहमी निरनिराळ्या मालिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या, प्रेक्षकांना आवडणार्‍या ह्या व्यक्तिरेखा रंगपंचमीसाठी एकत्र येऊन किती मजा करताहेत, हे आपल्याला येत्या सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.                   ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील सराफ परिवाराने सोनी मराठीवरील या सगळ्या व्यक्तिरेखांना आपल्या घरी होळी पार्टीनिमित्त एकत्र बोलावले आहे. यामिनी सराफ यांनी या सगळ्याचं आयोजन केलं असून राजवीर आणि मयूरी हे या सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणार आहेत. या पार्टीमध्ये ‘वीरू आणि प्राजक्ता’, ‘मीरा आणि मल्हार’, ‘बयो आणि डॉ. विशाल’, ‘यशोधन आणि असीम’ हे सगळे कलाकार एकत्र दिसणार आहेत. या रंगपंचमी पार्टीमधील प्रमुख बाब म्हणजे या कलाकारांचे पेहेराव. सगळ्या जोड्या वेगवेगळ्या रंगांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. रंगपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळे रंग दिसतात. तशाच निरनिराळ्या रांगांमध्ये हे कलाकार आपल्याला दिसतील. शिवाय या महासंगममध्ये या प्रत्येक कलाकाराचे विशेष असे नृत्य सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होळी विशेष आणि प्रेक्षकांना आवडणार्‍या निरनिराळ्या गाण्यांवर हे कलाकार  थिरकताना दिसणार आहेत. आजवर कधी झालं नाही ते आता या रंगपंचमी महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे. सगळे कलाकार एकत्र थिरकतानाही आपल्याला दिसतील आणि हे सगळे एकत्र आल्यावर प्रेक्षकांना धमाल तर नक्कीच येणार. सगळे कलाकार आपल्या नेहमीच्या पेहरावात न दिसता विशिष्ट पेहरावात दिसणार आहेत.                   एवढ्या सगळ्यांच्या येण्याने मयूरी आणि राजवीर यांच्यामध्ये जवळीक निर्माण होणार का? मयूरी आपले राजवीरवरील प्रेम व्यक्त करेल का, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. त्याशिवाय मयूरी बॉडीगार्डच्या वेशात पार्टीमध्ये राजवीरसोबत असणार असेल, तर ती या सगळ्यांचं आदरातिथ्य करायला मयूरीच्या वेशात कशी येणार, हे पाहणं फार उत्सुकतेचं असेल. मयूरी हीच बॉडीगार्ड आहे का? त्याशिवाय यामिनी आणि जोजो मिळून मयूरीला त्रास देण्यासाठी काही विशिष्ट प्लॅन करतील का? हे सगळं आपल्याला रंगपंचमी महासंगममध्ये पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हीपण नक्की या  ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतल्या सराफांच्या घरातल्या या होळी पार्टीला. रंगपंचमी महासंगम सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
BusinessLatest NewsSports

येस बँकेची पॅरिस ऑलिंपिक्स २०२४ साठी इंडियन ऑलिंपिक असोसिएशनशी अधिकृत बँक भागीदार म्हणून भागिदारी

मुंबई – येस बँकेला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनसह (आयओए) भागिदारी केल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. या भागिदारीमुळे बँक पॅरिस ऑलिंपिक्स

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुलीची हत्या करून पित्याने स्वत:ही गळफास घेऊन केली आत्महत्या

लातूर  : लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागातील एका ३५ वर्षे वयाच्या वडिलाने आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीस बेडशीटने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Loksabha Election : काँग्रेस महाराष्ट्रात 18 जागांवर लढणार; 8 उमेदवार निश्चित

नवी दिल्ली : भाजपकडून एकीकडे २० उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तर महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला

Read More
Latest NewsPUNE

100 ते 300 गावांमध्ये विस्तार करत श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टच्या चिमणी संवर्धन कार्यक्रमाने घेतले उड्डाण!

पुणे : जागतिक चिमणी दिनानिमित्त श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट (SST) या TVS मोटर कंपनी आणि सुंदरमक्लेटन लिमिटेडच्या सामाजिक शाखेने चिमणी संवर्धनासाठी

Read More
Latest NewsPUNE

प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ‘पी.म.पी.एम.एल’ सेवा निवृत्त सेवकांचे उपोषण तूर्त मागे..!’

पुणे : ‘पीएमपीएमएल’ सेवा निवृत्त सेवकांना (२०१४ च्या शासन मान्य धोरणा नुसार), सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणे बाबत सेवा

Read More
Latest NewsMAHARASHTRA

निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात लवकरच पाणी सोडणार – आमदार डॉ. राहूल पाटील

परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांचा तसेच जनावरांच्या

Read More
ENGLISH

INDIAN ARMY LAUNCHES ARMY SPORTS GIRLS COMPANY (ASGC) TO EMPOWER YOUNG FEMALE ATHLETES

The Indian Army has taken a groundbreaking step by introducing the Army Sports Girls Company, aimed at nurturing girls talent

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नांदेडमध्ये ४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, १६ लाखाचे साहित्य जप्त

नांदेड : आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा

Read More
ENTERTAINMENTLatest News

आपलं बालपण आपल्याला आठवायला लावणारी ‘इंद्रायणी’

सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण

Read More
BusinessLatest News

ईस्पोर्ट्स आणि गेम डेव्हलपमेंट क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होण्याची आशा – सीआयआयच्या अध्यक्षांचे मत

पुणे : अत्यंत वेगाने वाढत असलेल्या बाजारपेठेत बौद्धिक संपदा क्षेत्रात नवीन वाटा चोखाळून ईस्पोर्ट्स आणि गेम डेव्हलपमेंट क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण

Read More
Latest NewsPUNE

शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान जनजागृती

पुणे  : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रम राबविण्यात येत असून २०८ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शिक्षकांच्या

Read More
Latest NewsPUNE

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राकडे

Read More
Latest NewsPUNE

कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे : कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत शीतल चौक, अशोका म्युझ सोसायटी, पारगेनगर व कौसरबाग येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंढी होत असल्याने

Read More
Latest NewsPUNE

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा

पुणे : कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी

Read More
Latest NewsPUNE

सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी; आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या विरुपणास

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशात रशिया सारखी निरंकुश हुकूमशाही आणू इच्छिणा-या भाजपला तडीपार करा – उद्धव ठाकरे

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उघडपणे गुजरातबद्धल विशेष ममत्व दाखवून राज्याराज्यांत शत्रुत्वाच्या भिंती उभे करीत असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Loksabha Election : शिरूरमधून आढळराव पाटील आता राष्ट्रवादीचे उमेदवार

पुणे :  शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी; तर ठाण्याचे आयुक्त सौरभ राव

  मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबई तसेच उपनगरांत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत.

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

पुणे  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील

Read More