Thursday, June 18, 2026
BusinessLatest NewsSports

येस बँकेची पॅरिस ऑलिंपिक्स २०२४ साठी इंडियन ऑलिंपिक असोसिएशनशी अधिकृत बँक भागीदार म्हणून भागिदारी

मुंबई – येस बँकेला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनसह (आयओए) भागिदारी केल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. या भागिदारीमुळे बँक पॅरिस ऑलिंपिक्स २०२४ मध्ये भारतीय टीमची अधिकृत बँकिंग भागीदार असेल. येस बँकेच्या मुंबई मुख्यालयात झालेल्या एका खास कार्यक्रमात या लक्षणीय भागिदारीची घोषणा करण्यात आली. यावेळी येस बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते व त्यात प्रशांत कुमार, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,  राजन पेंटल, कार्यकारी संचालकआयओएचे माननीय सदस्य – डॉ. पी. टी. उषा, अध्यक्षआयओए आणि माननीय खासदारराज्य सभा,  रघुराम अय्यर, मुख्य कार्यकारी अधिकारीआयओए,  मेरी कोम, अध्यक्षअथलीट्स कमिशन आणि लंडन ऑलिंपिक्स २०१२ ब्राँझ पदकविजेत्या आणि पॅरिसमधील भारतीय खेळाडू  मनू भाकेर,  राजेश्वरी रिया कुमारी श्रीमती परवीन हुडा आणि धीरज बॉमदेवरा यांचा समावेश होका.

ऑलिंपिक गुणवत्तेचा विकास करण्यातील यंत्रणेची ताकद दाखवून देण्याचे या भागिदारीचे उद्दिष्ट आहे. या तत्वाशी सुसंगत राहात येस बँकेने मिलकर जिताएंगे हे कॅम्पेन लाँच करत प्रत्येक विजयामागे एकजूट किती महत्त्वाची असते हे अधोरेखित करण्याचे ठरवले आहे. येस बँकेचे तत्व लाइफ को बनाओ रिच या भागिदारीशी सुसंगत असून त्यात अनुभव आणि आठवणींमध्ये सामावलेल्या जीवनाच्या श्रीमंतीवर भर देण्यात आला आहे. आपले खेळाडू जागतिक स्तरावर स्पर्धा करत असताना त्यांची कामगिरी राष्ट्रीय अभिमानाला बळ देणारी व एकत्रित अनुभवांचा नवा वारसा तयार करणारी असेल.

येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील भारताच्या कामगिरीने देशाला प्रेरणा दिली आहे. भारतीयांसाठी ऑलिंपिक विशेष महत्त्वाचे असून त्यानिमित्ताने सर्व देश खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतो. येस बँक भारतीय टीमला गुणवत्तेचा ध्यास घेण्याच्या प्रवासात पाठिंबा देण्यासाठी व पर्यायाने राष्ट्रीय अभिमान व कामगिरीप्रती योगदान देण्यासाठी बांधील आहे.

येस बँकेने पॅरिस ऑलिंपिक २०२४ साठी रवाना होणाऱ्या पथकासाठी येस ग्लोरी हे खास बचत खाते तयार केले आहे. यातून येस बँकेने खेळाडूंना शुभेच्छा देण्याचा आणि कुटुंबीयानी त्यांच्या प्रवासात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेण्याचा प्रयत्न केला आहे. येस ग्लोरी खात्याचे लाभ खेळाडूंच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही मिळणार आहेत.

 

येस ग्लोरीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

·         स्वागत करण्यासाठी मोफत ताज व्हाउचर

·         अस्थीरोगतज्ज्ञांद्वारे मोफत सल्लासेवा

·         आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या खर्चात शून्य क्रॉस- करन्सी मार्क अप.

·         मोफत वैद्यकीय विमा

·         येस ग्लोरी गोल्ड डेबिट कार्ड (मर्यादित आवृत्ती खास डेबिट कार्डआपल्या विजेत्या खेळाडूंसाठी खास तयार केलेले)

·         मोफत आंतरराष्ट्रीय लाउंज अक्सेस

या भागिदारीविषयी आयओएच्या अध्यक्ष पी. टी. उषा म्हणाल्या, इंडियन ऑलिंपिक असोसिएशन आणि येस बँकेदरम्यान झालेल्या या भागिदारीविषयी मी आनंदी आहे. या भागिदारीअंतर्गत येस बँक पॅरिस २०२४ ऑलिंपिक खेळांची खास बँकिंग भागीदार असेल. या दमदार भागिदारीमुळे आमच्या खेळाडूंना अधिक आर्थिक पाठिंबा व सेवा मिळेल. येस ग्लोरी डेबिट कार्ड हे खेळाडूंना नाविन्यपूर्ण सुविधा पुरवण्याची व त्यांना कोणत्याही आर्थिक काळजीशिवाय ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करण्याची मुभा देण्याची आमची बांधिलकी दर्शवणारे आहे.

येस बँक आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशन यांच्यातील भागिदारीसाठी आयओएस स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटने सहकार्य केले आहे.

आयओएस स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक  नीरव तोमार या भागिदारीविषयी म्हणाले, आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी येस बँकेचे भारतीय टीमचे प्रायोजक म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. बऱ्याच काळापासून येस बँक खेळाच्या प्रसारासाठी काम करत असून ऑलिंपिक खेळांसाठी भारतीय टीमसह करण्यात आलेली ही भागिदारी देशात खेळाचा विकास करण्याप्रती त्यांची बांधिलकी दाखवणारी आहे. त्याचप्रमाणे ही भागिदारी यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय टीमला यश मिळवून देण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या सामाईक ध्येयाचे प्रतीक आहे. एकत्रितपणे भारतीय टीमच्या यशासाठी योगदान देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्यावर ही जबाबदारी टाकत भारतीय टीमचे अधिकृत कमर्शियल भागीदार म्हणून विश्वास दाखवल्याबद्दल मी इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचा आभारी आहे.

कुमार पुढे म्हणाले, या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही देशाला ऑलिंपिककडे केवळ पदक मिळवण्याचा ध्यास म्हणून पाहाण्याऐवजी जागतिक मंचापर्यंत आपल्या खेळाडूंनी केलेल्या प्रवासाचेत्यामागच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करण्याची संधी म्हणून पाहाण्याची प्रेरणा देणार आहोत. संपूर्ण क्रीडा यंत्रणा, जिंकलेल्या प्रत्येक पदकामागचे एकत्रित प्रयत्न यांचे कौतुक करण्यास आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. आज लाँच करण्यात आलेली आमची बँकिंग सेवा या भागिदारीचेच विस्तारित रूप असून त्याद्वारे खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांचा बँकिंगचा अनुभव उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. येस बँक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी आणि एकत्रित प्रयत्नांतून दर्जेदार कामगिरी करण्याची संस्कृती रूजवण्यासाठी बांधील आहे. एकत्रितपणे आम्ही खरंच #MilkarJitayengey.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading