Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुलीची हत्या करून पित्याने स्वत:ही गळफास घेऊन केली आत्महत्या

लातूर  : लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागातील एका ३५ वर्षे वयाच्या वडिलाने आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीस बेडशीटने गळफास देऊन तिला ठार केल्याची तसेच  स्वत:ही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली असून े या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदरील घटना नेमक्या कोणत्या कारणातून घडली याचा पोलीस शोध घेत आहेत.

मार्केट यार्डाच्या दक्षीण गेटच्या समोर भुतडा कुटुंबीय राहते. यांचे याच परिसरात कोरे गार्डनसमोर ईडली गृह आहे. अभय लखन भुतडा (वय ३५) हा इडली गृहातून जवळच असलेल्या घरी आला. मुलीला ईडली देतो व शाळेत नेऊन सोडतो असे कारण सांगितले. घरी आल्यानंतर त्याच्या मनात कोणता राग होता, काय कारण होते माहिती नाही. पण, आपल्या पोटच्या सहा वर्षे वयाच्या मुलीस अगोदर बेडशिटने गळफास देऊन तिला ठार केले व स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली.

अभय लखन भुतडा याने स्वत:च्या मुलीस ठार करून स्वत: ही आत्महत्या केली. हा प्रकार का घडला या प्रकारामागे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भुतडा परिवार मोठा आहे. त्यांची या परिसरात मोठी इमारत आहे. बहुदा आर्थिक कारणावरून असा निर्णय अभय भुतडा यांनी घेतला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल होईल.  या घटनेमागे नेमके कारण काय हे पोलीस तपासातच निष्पत्र होईल, असा अंदाज लावण्यात येत आहे. या घटनेच्या वेळी अभय भुतडा यांची पत्नी याच परिसरात असलेल्या  माहेरी गेली होती, असेही सांगण्यात येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading